मास्क धुवून होते विकणार, पण कामगाराने फेकून दिले कचऱ्यात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मास्क धुवून होते विकणार, पण कामगाराने फेकून दिले कचऱ्यात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गोदामात बेकायदेशीरपणे मास्कची साठवणूक करणाऱ्या मालकाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिंवडी, 11 मार्च : भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईन लगत कचऱ्याच्या ठिगाऱ्यात पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मास्क फेकणाऱ्या गोदाम कामगाराविरोधात नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.  तसंच गोदामात बेकायदेशीरपणे मास्कची साठवणूक करणाऱ्या मालकाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

इम्रान शेख असं अटक करण्यात आलेल्या गोदाम कामगाराचे नाव आहे. सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार इलेक्ट्रॉनिक मालासह परदेशात वापरलेले मास्क सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहेत. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने परदेशातून वापरलेले मास्क येथील गोदामात धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा खळबळजनक गंभीर प्रकार भिवंडीत गोदाम मालक करीत असल्याची बातमी न्यूज18 लोकमतने दाखवली होती.

त्यानंतर शनिवारी भिवंडी पोलिसांना  पंचायत समिती आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तपासणी केली असता भिवंडी तालुक्यातील वळगाव येथील पारसनाथ कंपाऊंड गोदामातील माल पुर्णा ग्रामपंचायत  हद्दीतील मुंबई मनपा पाणी पुरवठा पाईपलाईन शेजारील कचऱ्यात मोठ्या प्रमाणात पुरावा नष्ट करण्याचा हेतूने फेकून दिल्याचे उघडकीस आलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेत तपास सुरू केला असता गोदाम मालकाचा सांगण्यावरून इम्रान शेख या कामगाराने ते फेकून दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. इम्रान याला नारपोली पोलिसांनी मंगळवारी अटक करून न्यायालयात हजार केले. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2020 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading