बीड, 9 मार्च : रात्रगस्तीवर असलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. येथील गढी उड्डाणपुलावर आज पहाटेच्या सुमारास विवेक सदाशिव कांबळे (वय 34) कर्तव्यावर होते. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक होती. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dhule Solapur National Highway The unfortunate death of a policeman) गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात अपघातात दहा जणांचा बळी गेला आहे. पोलीस कर्मचारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर पेट्रोलिंग करत होते. आज पहाटेच्या सुमारास कांबळे हे पोलीस व्हॅनमधून खाली उतरले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला. मागील चार दिवसात बीड जिल्ह्यामध्ये अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी बीड- परळी मार्गावर पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर पुन्हा मंगळवारी पहाटे धुळे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने पोलीस कर्मचारी कांबळे यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. धडक दिलेल्या त्या अज्ञात वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत. (Dhule Solapur National Highway The unfortunate death of a policeman) हे ही वाचा- Nagpur News:खुर्चीवर बसवले आणि हात पाय बांधून 65 वर्षीय व्यक्तीची क्रुरपणे हत्या कर्तव्यावर असताना कांबळे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जवळपास दहा जाण्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातच रविवारी बीड परळी रोडवर भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा असतानादेखील सुसाट वेगाने गाडी चालवणाऱ्यांची व नियम तोडणार यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.