मुंबई, 9 ऑक्टोबर : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे… 1"आपण सहन केलं, पण आता अती होत आहे. स्वत: शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत, हे अती होत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हाला मिळू नये म्हणून खोकेसूरांनी प्रयत्न केले", अशा रोखठोक पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली.
2 जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी मी कोरोना काळात वेळोवेळी याच माध्यमातून येत होतो आणि काही सूचना देत होतो. त्या सूचना तुम्ही पाळल्या आणि आपण कोरोनावर मात केली. आपला संवाद त्यावेळेला चालू होता त्यावेळी अनेकांनी सांगितलं आणि यावेळी देखील अनेकजण भेटतात आणि सांगतात की, उद्धवजी तुम्ही आमच्याच कुटुंबाचे एक भाग झालेले आहात. 3 आज मी माझ्या कुटुंबियांशी पुन्हा एकदा एक वेगळ्या विषयाशी मन मोकळं करायला आणि संवाद साधायला या माध्यामातून भेटायला आलेलो आहे. यापूर्वी मी आपल्यासमोर आलो होतो तोही काळ मला आठवतोय. 4 शिवसेनाप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्रीपदी नको, ते पद मलाच पाहिजे, असं म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली. त्यावेळेला मी आपल्यासमोर आलो होतो आणि वर्षा या शासकीय निवासस्थानाचा त्याग केला होता. त्यानंतर मी इथेच बसून मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला होता. तोही संवाद मी याच माध्यमातून साधला होता. 5 आता तर तीन महिने होऊन गेले. मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं त्यांनी ते घेतलं. ज्यांना सर्वकाही देवून सुद्धा एक मनामध्ये धुसफूस नाराजी होती, तेही गेले. ठीक आहे. आपण काही बोललो नाही अशातला भाग नाही. पण आपण सहन केलं. 6 आता अती व्हायला लागलं आहे. कारण शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको इथपर्यंत मनसुबे असू शकतात. पण हे स्वत: शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत. हे अति होतंय. त्यासाठी आवाका काय हेही विचार करायचं आहे. पुढचं काही बोलायचं आधी मी सगळ्यांना धन्यवाद देतोय. 7 आता अती व्हायला लागलं आहे. कारण शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको इथपर्यंत मनसुबे असू शकतात. पण हे स्वत: शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत. हे अति होतंय. त्यासाठी आवाका काय हेही विचार करायचं आहे. पुढचं काही बोलायचं आधी मी सगळ्यांना धन्यवाद देतोय. 8 खरं म्हणजे मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. अनेक घटनातज्ज्ञांनी सांगितलं आहे, घटनेनुसार निकाल लागला तर काय लागणार आहे ते त्यांनीच सांगितलं आहे. उद्या त्यांचे बारा वाजल्यानंतर हा जो गोंधळ घातला गेला आहे तो निस्तारणार कोण? मुळामध्ये तेच जर अपात्र ठरले तर आजचं जे गोठवलंपण आहे त्याची जबाबदारी घ्यायची कोणी? 9 माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यादेवता नक्की आपल्याला न्याय देईल ही मला खात्री आहे. काल निवडणूक आयोगाने आपल्याला आदेश दिल्यानंतर आपण तात्काळ निवडणूक आयोगाला तीन चिन्हे दिली आहेत. यामध्ये एक त्रिशूळ आहे. दुसरं उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल. तीन नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी निवडणूक आयोगाला दिली आहेत. त्यातील पहिलं नाव हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, तिसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. 10 निवडणूक आयोग म्हटल्यानंतर नि:पक्षपातीपणा आठवतं. कारण तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात. आपण म्हटल्याप्रमाणे नावं आणि चिन्हं सादर केली आहेत. अंधेरीची पोटनिवडणूक आहे. आम्हाला लवकरात लवकर यातील एक चिन्ह आणि एक नाव द्या. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो कारण शिवसेनेने काय चिन्हे आणि नाले दिली आहेत ते जनतेला सांगितलं आहे. पण समोरच्यांनी काय दिलंय ते सांगितलेलं नाही. याचाच अर्थ त्यांनी अजूनही काही सादर केलेलं नाही.