हैदराबाद, 16 ऑक्टोबर : महाराष्ट्रासह तेलंगणा भागात पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तेलंगणात पावसात लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सरकारी आकडेवारीनुसार किमान 5 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, शेती वाहून गेली गाड्या वाहून गेल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
मुसळधार पावसात 50 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील इब्राहिमपट्टनममध्येही बर्याच भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा सामना करावा लागला. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार आणि त्यांचे समर्थक घटनास्थळी पोहोचल्यावर तिथल्या संतप्त नागरिकांचा संताप अनावर झाला.
#WATCH: Locals hurled slippers at Ibrahimpatnam MLA Manchireddy Kishan Reddy & other TRS workers, during their visit to flood-affected Medipally area, yesterday. The MLA's vehicle was also vandalised. #Telanganapic.twitter.com/rAZTcSDCcc
संतापलेल्या नागरिकांनी आमदारासह त्यांच्या समर्थकांना चपल्लांनी धू-धू धुतलं. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारची असल्याची माहिती मिळाली आहे. इब्राहिमपटनम इथले आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी आणि त्यांचे टीआरएस कार्यकर्त्यांना नागरिकांच्या संतापाला समोर जावं लागलं. माचेरेड्डी किशन रेड्डी व अन्य टीआरएस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त मेडीपल्ली भागात भेट दिली त्यावेळी संतापलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. आमदारांच्या गाडीची तोडफोड देखील केली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.