मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /राहुल द्रविडची राजकारणात एन्ट्री? कर्नाटक निवडणुकीआधी सुरू करणार नवी इनिंग

राहुल द्रविडची राजकारणात एन्ट्री? कर्नाटक निवडणुकीआधी सुरू करणार नवी इनिंग

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ (Sourav Ganguly) टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ (Sourav Ganguly) टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ (Sourav Ganguly) टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई, 10 मे : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ (Sourav Ganguly)  टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे संमेलन हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये 13 ते 15 मे या कालाधीमध्ये होणार आहे. या शिबिराला राहुल द्रविड उपस्थित राहणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Elections 2023) तयारी भाजपानं सुरू केली आहे. द्रविडची भाजपाच्या शिबिराला उपस्थिती ही याच तयारीचा भाग मानली जात आहे.

राहुल द्रविडसह कुस्तीपटू बबिता फोगट देखील या शिबिराला उपस्थित राहणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशभरातून 139 प्रतिनिधी या शिबिरामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

गांगुलीनंतर द्रविड

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कोलकातामधील गांगुलीच्या घरी भोजन केले होते.

अमित शाह 'दादा'च्या घरी, गांगुलीचा लवकरच भाजप प्रवेश? 2021 मध्ये झालं नाही ते 2024 मध्ये होणार!

गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या आधीही या चर्चांनी जोर धरला होता. त्या निवडणुकीत भाजप जिंकल्यास गांगुलीला पश्चिम बंगालचं (West Bengal CM) मुख्यमंत्रिपद देऊ करण्यात आलं होतं, अशीही चर्चा होती; मात्र, सौरव गांगुलीने अद्याप कोणतीही राजकीय इच्छा प्रदर्शित केलेली नाही.

First published:

Tags: BJP, Karnataka, Rahul dravid