मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कारमध्ये हवा भरणं पडलं एक लाखाला; हिंगोलीतील शिक्षकासोबत घडला भलताच प्रकार

कारमध्ये हवा भरणं पडलं एक लाखाला; हिंगोलीतील शिक्षकासोबत घडला भलताच प्रकार

(File Photo)

(File Photo)

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षकाला कारमध्ये हवा भरणं चांगलंच महागात पडलं आहे.

हिंगोली, 10 नोव्हेंबर: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत (Vasmat) शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षकाला कारमध्ये हवा भरणं चांगलंच महागात (Teacher looted by unknown) पडलं आहे. कारच्या चाकात हवा भरेपर्यंत कारमधील 1 लाख रुपयांची रक्कम अज्ञातानं पळवली (1 Lakh theft) आहे. कारच्या चाकात हवा भरल्यानंतर, कारमधील रक्कम गायब असल्याचं पाहून संबंधित शिक्षकाला देखील धक्का बसला आहे. या प्रकरणी पीडित शिक्षकाने वसमत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथील रहिवासी असणारे शिक्षक शिंदे यांनी वसमत येथील एका बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढली होती. त्यानी एक लाखाची रक्कम एका पिशवीत ठेवून ही पिशवी आपल्या कारमध्ये ठेवली होती. रक्कम घेऊन घरी परत जात असताना, त्यांनी वसमत शहरातील ठक्कर कॉलनी परिसरात चाकांत हवा भरण्यासाठी कार उभी केली.

हेही वाचा-रिक्षा चोरी करून बदलायचे नंबर प्लेट; मग यासाठी करायचे वापर, मुंबईतील टोळीला अटक

दरम्यान चाकात हवा भरत असताना, अज्ञात चोरट्याने एक लाखावर डल्ला मारला आहे. हवा भरल्यानंतर कारमधील पिशवी गायब होता, शिक्षकाने वसमत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अधारे तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा आठवडी बाजार परिसर आणि नवीन बसस्थानक परिसरात शोध घेतला आहे. पण त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याप्रकरणी पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Theft