जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा भीषण अपघात, तरुणीनं जागीच सोडला जीव तर 5 वर्षांची चिमुरडी बचावली

मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा भीषण अपघात, तरुणीनं जागीच सोडला जीव तर 5 वर्षांची चिमुरडी बचावली

मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा भीषण अपघात, तरुणीनं जागीच सोडला जीव तर 5 वर्षांची चिमुरडी बचावली

तवेरा गाडीचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळली. यामध्ये एक तरुणी जागेवर ठार झाली तर तिघेजण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायगड, 29 मे : राज्यात लॉकडाऊनदरम्या अनेक भीषण अपघात घडले. असाच धक्कादायक अपघात रायगड - मुंबई गोवा महामार्गावर घडला आहे. तवेरा गाडीचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळली. यामध्ये एक तरुणी जागेवर ठार झाली तर तिघेजण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमरापूर पुलावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 5 वर्षांची चिमुरडी बचावली आहे तर तिच्यासोबत असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची पोलिसांना माहिती देण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे. अपघात धडताच स्थानिकांनी तात्काळ जखमींना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिघांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील अक्षय बोऱ्हाडे प्रकरणाला नवं वळण, FB व्हिडिओनंतर उमटले राजकीय पडसाद ही गाडी कुडाळ इथून मुंबईकडे निघाली होती. रस्त्यात टायर फुटल्यामुळे वेगात गाडी बाजूला असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे मोठा हादरा बसला. यामध्ये गाडीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी अपघाताची चौकशी करत असून नेमक्या घटनेची चौकशी करत आहेत. रस्त्याच्या मधे असलेलं अपघाती वाहन बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात