अहमदाबाद, 18 मे : महाराष्ट्रातून गुजरातला (Gujrat Tauktae Cyclone) पोहोचल्यानंतर तौत्के चक्रीवादळानं (Tauktae Cyclone) या ठिकाणीही हैदोस सुरू केला आहे. गुजरातच्या अनेक शहरांमध्ये जोरदार वादळी वारा आणि पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदाबाच्या (ahmedabad) प्रसिद्ध यू एन मेहता रुग्णालयाच्या (U N Mehta Hospital) नुकसानीचादेखिल एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
(वाचा-परमवीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार)
तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकल्यानंतर याठिकाणी त्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरातही याचा हैदोस पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांचं इमारतींचं लहानमोठं नुकसान झाल्याचंही पाहायला मिळालं. अहमदाबादच्या यू एन मेहता हॉस्पिटलला देखिल या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या हॉस्पिटलच्या इमारतीला समोरून लावण्यात आलेली ब्युटीफिकेशन ग्रील ही जोरदार वाऱ्याच्या दबावामुळं तुटून खाली कोसळली. हॉस्पिटलच्या इमारतीच्या समोरील इमारतीतून याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या मध्ये वाऱ्यानं ग्रील पूर्णपणे तुटून खाली कोसळत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
#Tauktecyclone गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर आता तिथे हैदोस सुरू आहे. अहमदाबाद शहरात सोसाट्याच्या वाऱ्याने यू एन मेहता रुग्णालयाची बाहेरची भिंत पडली. परिमल क्रॉसिंगजवळ भर चौकात एक होर्डिंग वाऱ्याने पडलं. कारचालक थोडक्यात बचावला. pic.twitter.com/jNIFnD9YX4
— News18Lokmat (@News18lokmat) May 18, 2021
सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणालाही काही इजा झालेली पाहायला मिळाली नाही. मात्र अहमदाबादमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यावर पावसाचा तडाखाही पाहायला मिळत आहे. त्यामुळं इतरही काही ठिकाणी दुर्दैवी घटना समोर येत आहेत. शहरात परिमल क्रॉसिंगजवळ एक होर्डिंग पडल्यामुळं एक अनर्थ थोडक्यात टळला. हे होर्डिंग पडला तेव्हा एक कार तिथून गेली. अगदी काही क्षणाचा फरक जाल्याने कार चालक यातून बालंबाल बचावला.
अहमदाबादेची दैना! भर चौकात वादळाने उडवलं होर्डिंग. कारचालक थोडक्यात वाचला#CycloneTauktae pic.twitter.com/LCP6xScR1b
— News18Lokmat (@News18lokmat) May 18, 2021
(वाचा-...आणि एका क्षणानं दिली मृत्यूला हुलकावणी; चक्रीवादळाचा अंगावर काटा आणणारा VIDEO)
त्याशिवाय अहमदाबादमध्येच GMDC ग्राऊंडवरच तयार करण्यात आलेल्या ड्राइव्ह थ्रू टेस्टिंगच्या कियोस्कचंदेखिल यामुळं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदाबादमध्ये या वादळामुळं तब्बल 189 झाडे पडली. 43 ठिकाणी पूर आला. मध्य विभागात 4 इमारती कोसळल्या. 18 वीजेचे खांब कोसळले. 5 खासगी इमारती, 27 कच्च्या इमारती आणि 377 होर्डिंगचे नुकसान झाले. वासना बॅरेजचे 6 दरवाजे देखिल उघडण्यात आले आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये प्रचंड नुकसान झाले असून. आता हे वादळ उत्तर गुजरातकडे कूच करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmedabad, Cyclone, Gujrat, Live video