मुंबई, 18 मे : तौत्के चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात हाहाकार झाला आहे. मुंबई व उपनगरांमध्येही तौत्के चक्रीवादळचा कहर पाहायला मिळाला. सोसाट्याचा वारा आणि तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी मोठीच्या मोठी झाडं उन्मळून पडली. आतापर्यंत यासंदर्भातील अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईतील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.
विक्रोळीतील धडकी भरवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. विक्रोळीत तौत्के चक्रीवादळामुळे रस्त्यावर एक मोठं झाड कोसळलं. यादरम्यान एक महिला रस्ता क्रॉस करीत होती. महिलेने प्रसंगावधान राखल्यामुळे तिचा जीव वाचला आहे.
एएनआयने यासंदर्भातील व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आपण पाहू शकता की, एक महिला रस्ता क्रॉस करीत होती. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेलं एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं. वेळीत महिलेच्या लक्षात आल्यामुळ ती तत्काळ तेथून पळाली. आणि झाड रस्त्यावर कोसळलं. सेंकदाचा जरी उशिर झाला असता तरी महिलेच्या जिवावर बेतू शकलं असतं.
हे ही वाचा-अरे रे, छप्पर उडतय'; उंच इमारतींमधून सुरू होता प्रवास; चक्रीवादळाचा भयावह VIDEO
मुंबई तुफान पावसामुळे मोठं नुकसान
#WATCH | Mumbai: A woman had a narrow escape when she managed to move away from the spot just in time as a tree uprooted and fell there. (17.05.2021) Mumbai received heavy rain and wind yesterday in wake of #CycloneTauktae (Source: CCTV footage) pic.twitter.com/hsYidntG7F
— ANI (@ANI) May 18, 2021
मुंबईत चक्रीवादळामुळे 230 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तुफान पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. तर दुसरीकडे झाडं आणि विजेचे पोल पडल्यामुळे नुकसान झालं आहे. वादळामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये लावलेली होर्डिंगही पडली. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Viral video.