ताप आल्यावर साधा फ्लू आहे की कोरोना कसं ओळखायचं? काय आहे फरक

ताप आल्यावर साधा फ्लू आहे की कोरोना कसं ओळखायचं? काय आहे फरक

ताप आला म्हणजे Covid-19 चा संसर्ग झाला असं समजायचं की तो साधा फ्लू असू शकतो? कसा ओळखायचा फरक?

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : जगभरात कोरोनाने (Coronavirus) कहर केला आहे. त्यातच बदलत्या हवामानात अन्य काही आजारांनी डोकं वर काढलं आहे. फ्ल्यू, व्हायरलचा ताप आणि कोरोना यांची लक्षणं जवळपास सारखीच असल्याने बऱ्याच वेळा आपला गोंधळ उडतो. ताप आला म्हणजे Covid-19 चा संसर्ग झाला असं समजायचं की तो साधा फ्लू असू शकतो? कसा ओळखायचा फरक? अशा वेळी या दोन्ही आजारांची लक्षणं (Symptoms of Coronavirus), उपचार (Covid treatment) जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं खाली देत आहोत.

फ्लू काय आहे?

फ्ल्यु हा एक संसर्गजन्य आजार असून, त्याला Influenja असंही म्हणतात. यात नाकात व घशात संसर्ग होतो व काही दिवसांनी तो आपोआप बराही होतो.

कोरोना आणि फ्लूमध्ये काय फरक  आहे ?

दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच असतात मात्र फ्ल्यु हा 4 ते 5 दिवसांत बरा होतो तर आतापर्यंतच्या संशोधनानुसार कोरोना हा अधिक काळ राहतो. कोरोनामध्ये लवकर उपचार घेतले नाहीत तर प्रकृतीवर गंभीर परिणामही होऊ शकतात.

फ्ल्युचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होतो का?

हो, हा संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होऊ शकतो. कोरोनाचेही संसर्गजन्य असल्यामुळे तोही एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होऊ शकतो.

कोरोना आहे का फ्लू कसे ओळखावं?

सर्दी, ताप, घशात खवखव अशी लक्षणं दोन्ही आजारांत सारखीच आढळतात, मात्र, वास न येणे, तोंडाची चव जाणं ही लक्षणं जाणवल्यास तातडीने कोरोनाची तपासणी करून घ्यावी.

लक्षणं जाणवल्यावर डॉक्टरांकडे कधी जावं?

कुठलीही लक्षणं जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे. तपासणी करून घ्यावी, गरज भासल्यास कोरोनाची टेस्ट करून घ्यावी.

लसीकरणाची भूमिका काय?

फ्लूची लस  कोरोना बरा करू शकत नाही. ती फक्त कोरोनाला नियंत्रणात ठेवू शकते.

फ्ल्यू आणि कोरोनाची लागण कोणालाही होऊ शकते. कोरोनामध्ये वयस्क व्यक्ती आणि अन्य व्याधी असलेल्यांना अधिक धोका आहे.

उपचार कसे करावे?

कोरोना हा बरा होणारा आजार आहे. त्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. त्याची लागण झाली तर 14 दिवस स्वतःला विलगीकरणात ठेवणं उत्तम.

अनेक घरगुती उपचारही यात फायदेशीर ठरू शकतात.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 22, 2020, 4:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading