मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबई-पुणे हायवेवर भरधाव ट्रेलरची स्विफ्ट आणि टेम्पोला धडक, दोन जण जागीच ठार

मुंबई-पुणे हायवेवर भरधाव ट्रेलरची स्विफ्ट आणि टेम्पोला धडक, दोन जण जागीच ठार

खालापूर टोल नाक्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट तसेच टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.

मुंबई, 29 जून : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट तसेच टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या अपघातात स्विफ्ट कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून अपघात ग्रस्त ट्रेलर तसेच एक टेम्पो महामार्गावर आडवा पडला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. एक्सप्रेसवेवर मुंबई लेनला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणा तसंच आयआरबी हे घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.

मुंबईत येणाऱ्यांसाठी नवा नियम, या आदेशाचं पालन नाही झालं तर होईल कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर जखमींनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट

सध्या मृतांची ओळख पटली नसल्याची माहिती समोर येत असून पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. दरम्यान घटनास्थळी जमलेली गर्दी कमी करण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Mumbai pune expreeway, Mumbai pune express way accident