मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सुशांत आणि दिशाच्या रिलेशनवर आरोप करणाऱ्यांना चपराक, झाला मोठा खुलासा

सुशांत आणि दिशाच्या रिलेशनवर आरोप करणाऱ्यांना चपराक, झाला मोठा खुलासा

'लाॅकडाउन काळात तरुणांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे आणि पब्जी खेळावे' अशी पोस्ट सुशांत सोशल मीडियावर टाकणार होता.

'लाॅकडाउन काळात तरुणांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे आणि पब्जी खेळावे' अशी पोस्ट सुशांत सोशल मीडियावर टाकणार होता.

'लाॅकडाउन काळात तरुणांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे आणि पब्जी खेळावे' अशी पोस्ट सुशांत सोशल मीडियावर टाकणार होता.

मुंबई,  18 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुशांतचे आपल्या मॅनेजर दिशा सॅलिअन सोबत व्हॉट्सअ‍ॅपवर झालेली चर्चा समोर आली आहे.

'लाॅकडाउन काळात तरुणांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे आणि पब्जी खेळावे' अशी पोस्ट सुशांत सोशल मीडियावर टाकणार होता. याबद्दल पब्जी सोबत तशी डील ही झाली होती, असा खुलासा दिशा आणि सुशांत सिंग राजपूतमध्ये झालेल्या व्हाॅटसअ‍ॅप चॅटमधून समोर आला आहे. तसंच दिशा आणि सुशांत सतत संपर्कात होते.

लाॅकडाउन लागल्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे 1 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान सुशांत आणि दिशामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चा झाली होती. 1 एप्रिलला दिशाने केलेल्या मॅसेजला सुशांतने 2 एप्रिलला रिप्लाय दिला होता.

काय झाला होता दोघांमध्ये संवाद ?

दिशा : खाद्य तेलाच्या एका कंपनीच्या १ वर्षासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून राहायचे आहे. १ दिवसाचे शूटिंग असणार आहे आणि त्यानंतर टिवीसीसाठी रेकॉर्डिंग असणार आहे. वर्षातून उत्सवांच्या दिवशी डिजिटल फ्लॅटफॉर्म वर खाद्य तेलाच्या संदर्भातील 3 पोस्ट कराव्या लागणार आहेत. कृपया, या बद्दल सांगावे. मी त्यांना ह्यासाठी 60 लाख रुपये सांगू का?

सुशांत सिंग - ब्रँडचे नाव काय आहे.

दिशा - त्या लोकांना आताच त्यांच्या ब्रँड चे नाव उघड करायचे नाही. हा ब्रँड कशा संदर्भात आहे, या बद्दल माहिती घेऊन आपण पुढची बोलणी करू शकतो.

सुशांत - ओके. कुल, थँक्यू

यानंतर  सुशांत सिंग व दिशा सालियन यांच्यात पुन्हा ७ एप्रिल रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चा झाली.

दिशा : पबजी एक डिजिटल कॅम्पेन सुरू करीत असून याच्या माध्यमातून ते नागरिकांना आवाहन करू इच्छितात की, नागरिकांनी घरात बसून पबजी खेळावे व सुरक्षित राहावे. यासाठी आपल्याला  इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करावा लागणार आहे. जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर मला सांगा, जर तुम्हाला हे ठीक वाटत असेल तर मी त्या व्हिडिओची स्क्रिप्ट मागवून घेते.

सुशांत : यस प्लिज 

10 एप्रिल या दिवशी सुशांत सिंग व दिशा सॅलियन या दोघांची चर्चा होते आणि पब्जी संदर्भात डिल फायनल केली जाते.

दिशा सालियन : हाय सुशांत,  पब्जीसोबत बोलणी पूर्ण झाली असून त्यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी 12 लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे आणि या बरोबरच टॅक्स संदर्भात सुद्धा संमती त्यांनी दर्शवली आहे. पुढच्या आठवड्यात ते पब्जी संदर्भातील स्क्रिप्ट पाठवत असून त्यापुढील माहिती मी तुम्हाला कळवेल.

सुशांत : पब्जी स्क्रिप्ट येऊ दे, त्यानंतर आपण पाहू.

त्यामुळे सुशांत आणि दिशामध्ये काहीही संबंध नाही. सुशांत दिशाला ओळखायचा नाही या सर्व चर्चांना या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

First published:
top videos