जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / दिवसा वारंवार डुलक्या काढणाऱ्यांनी इकडं लक्ष द्या; या गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

दिवसा वारंवार डुलक्या काढणाऱ्यांनी इकडं लक्ष द्या; या गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

दिवसा वारंवार डुलक्या काढणाऱ्यांनी इकडं लक्ष द्या; या गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

दिवसभरात अनेक वेळा डुलकी घेणं हे आरोग्याच्या काही गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की दिवसा पॉवर नॅप घेणे (थोडा वेळ झोप घेणे) फायदेशीर आहे, परंतु दिवसातून अनेक वेळा असं करणं सर्वसाधारण नाही. संशोधनातील माहिती जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जुलै : तुम्हीही मेट्रो, बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा घरी असतानाही वारंवार डुलकी घेता का? उत्तर होय असेल तर आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दिवसभरात अनेक वेळा डुलकी घेणे हे आरोग्याच्या काही गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की दिवसा पॉवर नॅप घेणे (थोडा वेळ झोप घेणे) फायदेशीर आहे, परंतु दिवसातून अनेक वेळा असे करणे सर्वसाधारण नाही. उच्च रक्तदाब किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका संभवतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात याबाबत आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत, ज्या जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू (Health Diseases Sign) शकते. अभ्यासात धक्कादायक बाबी समोर आल्या - मेडिकल न्यूज टुडे च्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये वारंवार डुलकी घेण्याबाबत एक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये संशोधकांना असे आढळून आले की, वारंवार डुलकी घेणे हे उच्च रक्तदाब (High BP) आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याचे लक्षण असू शकते. हा अभ्यास अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात संशोधकांनी 5 लाखांहून अधिक लोकांचा समावेश केला होता. त्यात असे आढळून आले की, जे लोक अधूनमधून डुलकी घेत नाहीत, त्यांच्या तुलनेत डुलकी घेतात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका 7 टक्के, स्ट्रोकचा धोका 12 टक्के आणि रक्ताच्या गुठळ्यांमुळे स्ट्रोक (इस्केमिक स्ट्रोक) होण्याचा धोका 9 टक्के असतो. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा वारंवार डुलक्या घेण्यामुळे धोका वाढतो अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक दिवसभरात वारंवार डुलकी घेतात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका 12%, स्ट्रोकचा धोका 24% आणि रक्ताच्या गुठळ्यांमुळे स्ट्रोकचा धोका 20% असतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, वारंवार डुलकी घेणे हे उच्च रक्तदाबाच्या वाढीसाठी संभाव्य जोखीम घटक आहे. मात्र, अशा झोपेचा रक्तदाब किंवा स्ट्रोकवर परिणाम का होतो, हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. 2017 मध्ये असाच एक अभ्यास समोर आला होता, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की दिवसा डुलकी उच्च रक्तदाबाच्या उच्च जोखमीशी संबंधित असू शकते. चांगली झोप घेतल्याने आरोग्य चांगले राहते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात