मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जादुटोणाचा दोन निष्पाप बळी; सावत्र आईकडून मुलांची हत्या, 7 वर्षांच्या मुलाचा कापला प्रायव्हेट पार्ट

जादुटोणाचा दोन निष्पाप बळी; सावत्र आईकडून मुलांची हत्या, 7 वर्षांच्या मुलाचा कापला प्रायव्हेट पार्ट

जादूटोण्याच्या संशयावरून महिलेनं 11 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा गळा दाबला.

जादूटोण्याच्या संशयावरून महिलेनं 11 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा गळा दाबला.

जादूटोण्याच्या संशयावरून महिलेनं 11 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा गळा दाबला.

  • Published by:  Pooja Vichare

दतिया, 01 ऑक्टोबर: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दतिया (Datia) जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी सावत्र (stepmother) आईला अटक केली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून महिलेनं 11 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा गळा दाबला. आरोपी महिलेनं मुलांवर चाकूनं वार (stabbed them with a knife) केल्याचंही समजतंय.

निर्दयी महिलेनं मुलाचा प्रायव्हेट पार्टही कापल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी महिलेला या मुलांनी आपल्या सख्ख्या आईला भेटणं आवडतं नव्हतं.

SDOP सुमित अग्रवाल यांनी सांगितलं की, ही घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता बक्सी हनुमान मंदिरामागील एसपी पर्वतावर घडली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. तपासात दोन्ही मुलांची हत्या त्यांची सावत्र आई ज्योती कोरीनं केल्याचं समोर आलं. ज्योती छत्तीसगडमधील कांकेरच्या टोला गावातील रहिवासी आहे. आरोपी महिलेनं 8 वर्षापूर्वी 37 वर्षीय अरविंद महोरशी लग्न केलं. अरविंदनं पहिली पत्नी माधुरीला घटस्फोट न देता सोडून दिलं होतं.

हेही वाचा- पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड, पुण्यातील धक्कादायक घटना  

अग्रवाल यांनी सांगितलं की, जेव्हाही मुलांची सख्खी आई माधुरी त्यांना भेटायला यायची. तेव्हा ज्योती वाद घालत असे. सावत्र आई ज्योतीनं मुलांची शाळाही बदलली होती.

काही महिन्यांपूर्वी ज्योती देखील गर्भवती राहिली होती. पण, 2 महिन्यांनंतर तिचा गर्भपात झाला. हीच गोष्ट हत्येचं मुख्य कारण बनले. आरोपी महिलेला वाटलं की माधुरीने जादूटोणा केला आहे. माधुरीचा बदला घेण्यासाठी ज्योतीनं निष्पाप मुलांची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा- भीषण अपघात; जागीच 7 जणांचा मृत्यू, बसच्या धडकेत कंटेनर थेट दरीत

अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा 11 वर्षीय मुलगी एका खोलीत मृत अवस्थेत पडली होती. तिच्या शरीरावर चाकूनं वार केलेले निशाण होते. दुसऱ्या खोलीत 7 वर्षांचा अर्णब देखील मृत अवस्थेत पडला होता. त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला होता.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh