मुंबई, 31 डिसेंबर : महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, मुंबई, जळगाव आणि इंदूरसह मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुन्हे शाखेने स्पा चालवणाऱ्या कॉल गर्ल गँगचा भंडाफोड केला आहे. लैंगिक रॅकेट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी 7 महिला आणि 5 ग्राहकांना अटक केली. स्पामध्ये सेक्स रॅकेट चालवले जात होते, जिथे 'हॅपी एंडिंग' कोड शब्द सांगितल्यावर ग्राहकांना कॉल गर्ल पुरवल्या जात असे.
या स्पामध्ये आलेल्या ग्राहकाला हवी असलेली कॉल गर्ल उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं पोलिसांना चौकशीअंती समोर आलं आहे. पण कॉल गर्ल हवी असेल तर 'हॅपी एंडिंग' हा कोड शब्द सांगावा लागतो अशी अट होती. भोपाळ व्यतिरिक्त या स्पाचे नागपूर, नाशिक, मुंबई, जळगाव आणि इंदूरशी संबंध आहेत. मुलींना येथून भोपाळसह इतर ठिकाणी पाठविले जात असे आणि त्यांचा व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांना चौकशीदरम्यान समजले की, या स्पामध्ये जाणारा ग्राहक जर हॅपी एंडिंग कोड वर्ड म्हणत असेल तर शरीर व्यापारासाठी त्याला मुलगी उपलब्ध करुन देण्यात येत असे. एवढेच नव्हे तर ग्राहकाला मालिश किंवा 'हॅपी एंडिंग' देणार का असेही विचारले जात असे. एक हजार रुपये मालिशचे आणि पाच ते 50 हजार रूपयांचा हॅपी एंडिंग पॅक देण्यात येतो. महाराष्ट्रातही असा व्यापार सुरू असल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकच खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या - वडिलांनी PubG डिलीट केल्याने तरुणीने फोडला हंबरडा, 6 लाख लोकांनी पाहिला VIDEO
स्पामध्ये येणाऱ्या ग्राहकांना आधी त्यांच्या आवडीची मुलगी निवडण्यासाठी अल्बम दिला जायचा आणि मुलगी पसंत केल्यानंतर तिचा भाव निश्चित करण्यात येतो. जे नियमित ग्राहक होते त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही ऑफर दिल्या जात असल्याचं पोलीस तपासाता समोर आलं आहे.
इतर बातम्या - धक्कादायक! आईसह 18 महिन्याच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत सापडला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणामध्ये 7 महिला आणि 5 ग्राहकांना अटक केली असून आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान, ज्या-ज्या ठिकाणी या स्पाचे कनेक्शन आहे त्या ठिकाणी पोलीस चौकशी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
इतर बातम्या - धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीने डोक्यात हातोडी घालून Ex Boyfriend ला संपवलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.