जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वडिलांनी PubG डिलीट केल्याने तरुणीने फोडला हंबरडा, 6 लाख लोकांनी पाहिला VIDEO

वडिलांनी PubG डिलीट केल्याने तरुणीने फोडला हंबरडा, 6 लाख लोकांनी पाहिला VIDEO

वडिलांनी PubG डिलीट केल्याने तरुणीने फोडला हंबरडा, 6 लाख लोकांनी पाहिला VIDEO

अभ्यास सोडून मोबाईलमध्ये व्यस्त राहणाऱ्या तरुणीला वळण लावण्यासाठी तिच्या वडिलांनी तिच्या फोनमधून PubG हा गेमच डिलीट केल्याने तिने हंबरडा फोडला आणि ती रडायला लागली. मेरे PubG…मेरे PubG असं म्हणत धाय मोकलून ती रडायला लागली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 31 डिसेंबर : मोबाईल आणि त्यावरच्या गेमचं वेड हे आता काही नवं राहिलं नाही. या वेडाचं रुपांतर आता व्यसनात झालं असून त्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. लग्नाच्या बोहोल्यावर चढल्यावर PubG खेळण्यात दंग असलेल्या नवरीचं नवऱ्यापेक्षा मोबाईलवरच जास्त लक्ष असतं. किंवा PubG खेळण्यात गर्क झालेल्या माणसाने पाण्याऐवजी अॅसीडचं पिऊन घेतलं अशीही घटना उघड झाली होती. त्यामुळे याचं किती वेड लागलंय हे लक्षात येतं. हे होत असतानाच आणखी एक व्हिडीओ आज व्हायरल झालाय. अभ्यास सोडून मोबाईलमध्ये व्यस्त राहणाऱ्या तरुणीला वळण लावण्यासाठी तिच्या वडिलांनी तिच्या फोनमधून PubG हा गेमच डिलीट केल्याने तिने हंबरडा फोडला आणि ती रडायला लागली. मेरे PubG…मेरे PubG असं म्हणत धाय मोकलून ती रडायला लागली. तो व्हिडीओ 1 जीबीचा होता. आता पुन्हा तो Install होणार नाही. मेरे PubG असं म्हणत ती जोर जोरात रडू लगाली. 1जीबी जागा झाल्यामुळे तुझा मोबाईल आता आणखी चांगला चालेल असं म्हणताच ती पुन्हा जोरात रडायला लागली. अनेक युझरने हा व्हिडीओ शेअर केलाय. आत्तापर्यंत तब्बल 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला असून त्याला 5 हजारांपेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत.

@punjabicouple786

bichari ki pubg dlt krdi #pubggirl #pubglover @cheshtamanchanda12

♬ original sound - Arunpopli
जाहिरात

पब्जी या मोबाईल गेममुळे चाकण परिसरातील एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाला असून उच्चशिक्षित असलेल्या या  तरुणाला नागरिकांनी चाकण पोलिसात पकडून दिलं आहे. या बातमीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ज्या तरुणाच्या डोक्यावर पब्जीमुळे परिणाम झाला आहे. आता अशा लोकांसाठी खास सेंटर्सही उभारण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात