मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महासागरातून तब्बल 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला आश्चर्याचा धक्का

महासागरातून तब्बल 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला आश्चर्याचा धक्का

अशी घटना खरंच घडली आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.

अशी घटना खरंच घडली आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.

अशी घटना खरंच घडली आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.

पूर्वीच्या काळात पोस्ट आणि ईमेल (Post and E-mail) यासारख्या संदेश वहनाच्या सुविधा नव्हत्या. तेव्हा लोक एखादी माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी पक्ष्यांचा वापर करायचे. किंवा त्या भागात जाणाऱ्या गाडीत पाठवायचे. बदलत्या काळानुसार माहितीची गोपनीयता जपण्यासाठी पत्र पोस्टाने  (Post letters) पाठवली जाऊ लागली. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संदेशवहनाच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. अशातच जर आम्ही तुम्हाला एका बाटलीमध्ये (Message in a Bottle) पाठवण्यात आलेल्या संदेशाबद्दल सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? अशी घटना खरंच घडली आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.

बाटलीमध्ये आलेला हा संदेश (Message Note in a Bottle) अटलांटिक महासागरातून (Atlantic ocean) आला आहे. हा संदेश कोणी, का आणि कोणासाठी लिहिलाय याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, सोशल मीडियावर लोक हा संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. 2400 मैल अंतर पार करू ही बाटली एका मुलाला सापडली आहे. तो मुलगा या बाटलीमधील संदेश लिहिणाऱ्याचा शोध घेतोय.

हे वाचा - कॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video

मासे पकडताना सापडली बाटली

पुर्तगालमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय क्रिश्चन सँटोस (Christian Santos) या मुलाला मासे पकडताना ही बाटली सापडली. ही बाटली प्लास्टिकची होती आणि थोडी तुटलेली होती. क्रिश्चनला ही बाटली रोडे आयलँडजवळ (Rhode Island) सापडली होती. अमेरिकी वृत्तपत्र बोस्टन ग्लोब (The Boston Globe) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2018 मधील आहे. या मुलाने आणि त्याच्या आईने ही बाटली उघडली, त्यात त्यांना एक चिट्ठी आढळली. ती वाचल्यानंतर या दोघांनी लिहिणाऱ्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

काय लिहिलंय चिठ्ठीत?

ही चिठ्ठी एका 13 वर्षीय मुलानं नोटकार्डवर ऑरेंज रंगाच्या मार्करने लिहिलीए. त्यात लिहिलंय, ‘आज थँक्सगिव्हिंग आहे. मी 13 वर्षांचा आहे आणि माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रोडे आयलँडला जातोय. मी व्हेरमॉण्टचा (Vermont) रहिवासी आहे.' याशिवाय चिठ्ठीत लिहिलंय की, ज्या कुणाला ही बाटलीमधील संदेश सापडेल त्यांनी तिथं लिहिलेल्या एका ईमेल अॅड्रेसवर संपर्क करावा. या मुलाने आणि त्याच्या आईने ईमेल केला मात्र त्यांना रिप्लाय आला नाही.

सोशल मीडियावर मुलाचा शोध सुरू

बाटली सापडली त्या क्रिश्चनची आई मॉली सँटोस यांनी या चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्या मुलाचा शोध घेण्यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. चिठ्ठी लिहिणाऱ्या मुलाला त्याने लिहिलेला संदेश किती दूर गेलाय ते कळावं, अशी सँटोस यांची इच्छा आहे. तसेच ही चिठ्ठी कोणत्या मुलाने का लिहिली हे जाणून घेण्यासाठी सँटोस उत्सूक आहेत. सध्या सँटोस यांची या चिठ्ठीसंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

First published:

Tags: Deep ocean, Write a letter