नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये असलेला बाबा का ढाबा ' (Baba Ka Dhaba) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. लॉकडाऊन काळात लोकं ढाब्यावर जात नव्हते, त्यामुळे हा ढाबा चालवणा 80 वर्षीय कांता प्रसाद (Kanta Prasad) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या ढाब्यावर जाण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांना डोनेशनही दिले. मात्र आता हेच कांता प्रसार पोलीस स्टेशनमध्ये पोहचले आहेत. कांता प्रसार यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या युट्यूबरविरुद्ध (Youtuber) डोनेशनचे पैसे न दिल्याचा आरोप करण्यातत आला आहे.
7 ऑक्टोबर रोजी युट्यूबर गौरव वसानने या ढाब्याचा व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनल व फेसबुकवर अपलोड केला आणि लोकांना वृद्ध जोडप्यास मदत करण्याचे आवाहन केले. हा व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल झाला आणि लोकांनी येथे गर्दी केली. यामुळे कोरोनाकाळात रखडलेल्या वृद्ध जोडप्याचा व्यवसाय झाला. दरम्यान काही लोकांनी त्यांना डोनेशन रुपातही मदत केली.
वाचा-'माँ तुझे सलाम’चं एवढं गोड व्हर्जन तुम्ही ऐकलं नसेलच,VIRAL होतोय चिमुरडीचा VIDEO
काय आहे आरोप?
मिळालेल्या माहितीनुसार कांता प्रसाद यांनी रविवारी मालवीय नगर पोलीस ठाण्यात गौरव वासन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यात डोनेशनच्या पैशांचा गैरवापर आणि हेरफेर केल्याचा आरोप आहे. आपल्या तक्रारीत कांता प्रसाद म्हणतात, 'व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत मला फक्त दोन लाखांचा चेक मिळाला आहे. आता बरेच ग्राहक ढाब्यावर येत नाहीत. येथे बरेच लोक फक्त सेल्फी काढण्यासाठी येतात. पहिल्याच दिवशी 10 हजारांची कमाई झाली. आता अवघ्या 3 हजार ते 5 हजार रुपये कमाई होत आहे.
वाचा-बाप रे! नदीमध्ये दिसला 50 फूटांचा महाकाय अॅनकोंडा VIDEO VIRAL
'सर्व रक्कम ट्रान्सफर केली'- युट्यूबर
गौरव वासन यांच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा मी बाबांच्या ढाब्याचा व्हिडीओ शूट केला तेव्हा तो इतका व्हायरल होईल याची मला कल्पना नव्हती. लोकं कांता प्रसाद यांना त्रास देतील म्हणून मी माझे बॅंक डिटेल्स दिले. वासननं बॅंक डिटेल्सही दिले आहेत. यात दोन धनादेश 1 लाख रुपये आणि 2 लाख 33 हजार रुपये किंमतीचे होते, तर तिसरा पेमेंट 45 हजार रुपये होते. मात्र कांता प्रसाद यांनी केवळ 2 लाख रुपये मिळाल्याचे सांगितले.