'रायझींग काश्मीर'च्या संपादकांची श्रीनगरमध्ये गोळ्या घालून हत्या

'रायझींग काश्मीर'च्या संपादकांची श्रीनगरमध्ये गोळ्या घालून हत्या

'रायझींग काश्मीर'चे संपादक सुजात बुखारी यांची श्रीनगरमध्ये हत्या करण्यात आली आहे. श्रीनगरमधल्या लाल चौकातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

  • Share this:

श्रीनगर,ता.14 जून : 'रायझींग काश्मीर'चे संपादक सुजात बुखारी यांची श्रीनगरमध्ये अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. श्रीनगरमधल्या लाल चौकात असलेल्या प्रेस कॉलनीमध्ये रायझींग काश्मीर या वृत्तपत्राचं ऑफिस होतं.

आपल्या ऑफिसमधून बाहेर पडत असतानाच गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात बुखारी यांचा जागीच मृत्यू झाला. बुखारी यांच्या सरंक्षणासाठी असलेला पोलिसही गोळीबारात ठार झाला आहे.

बुखारी हे इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडत होते. लाल चौक हा श्रीनगर शहरातला सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या भागात हत्या झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.

या आधीही बुखारी यांच्यावर 2000 मध्ये हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांना संरक्षण देण्यात आलं होतं. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

रमजान महिना असल्याने सुरक्षा दलानं एकतर्फे शस्त्रसंधी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडलीय. ईद झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरूद्ध धडक कारवाई करण्यात येईल असा इशार सुरक्षा दलानं दिला आहे.

 

 

First published: June 14, 2018, 8:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading