मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नॉट रिचेबल असलेल्या प्रताप सरनाईकांचं थेट राज्यपालांना पत्र, केली ही' मागणी

नॉट रिचेबल असलेल्या प्रताप सरनाईकांचं थेट राज्यपालांना पत्र, केली ही' मागणी

pratap sarnaik

pratap sarnaik

राज्य सरकारने प्रताप सरनाईक यांना करातून सुट दिली असून त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्याचा मनसुबा भाजपचा आहे. यासाठी लोकायुक्त आणि हायकोर्टातही दाद मागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पुन्हा स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहित संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 24 जानेवारी: राज्य सरकारने प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना करातून सुट दिली असून त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेण्याचा मनसुबा भाजपचा आहे. यासाठी लोकायुक्त आणि हायकोर्टातही दाद मागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पुन्हा स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहित संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे.

भाजप लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने महसूल बुडवला याची तक्रार त्यांनी केलीय. या पत्रात किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान यांनी कांदळवनची कत्तल केली, CRZ कायद्याचे उल्लंघन करून स्वछतागृह बांधलं, असा आशय नमूद करण्यात आला आहे. तसेच स्थानिक रहिवाशांसाठी संघर्ष करत असताना फक्त शिवसेना आमदार म्हणून माझ्याविरोधात तक्रार करण्यात आल्याचे प्रताप सरनाईक यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी आपले घर SRAमध्ये दाखवून मोठं घर लाटले. महापालिकेचे स्विमिंग पूल BOT तत्वावर घेऊन पाणी चोरी करत असून, भाजप नगरसेवक निधी मधून मेन्टेन करत आहेत. भावाची जिम अनधिकृत आहे. तो महसूल बुडवत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. आतापर्यंत भाजप प्रतिनिधींनी महसूल बुडवल्याची अनेक तक्रारी या पत्रात असून त्यासोबत पुरावे जोडण्यात आले आहेत. लोढा उद्योग समूह, टाटा उद्योग समूह तसेच मायकल जॅक्सन साठी विजक्राफ्ट संस्थेला सरकारने दंड माफ केल्याची माहितीदेखील पत्रातून दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?

भायखळा वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत परदेशातून प्राणी आणण्याच्या निविदांमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा गौफ्यस्फोट भाजपाने केला होता. या मुद्द्यावरून भाजप नेते (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली.

राज्य सरकारनं प्रताप सरनाईक यांना करातून सुट दिली असून त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्याचा मनसुबा भाजपचा आहे. यासाठी लोकायुक्त आणि हायकोर्टातही दाद मागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पुन्हा स्पष्ट केले आहे.

First published:

Tags: BJP, Mla pratap sarnaik, Shiv sena