10 मे : महाराणा प्रताप, शिवाजी महाराज ,गुरु गोविंदसिंग हे खरे हिरो आहेत. बाबर,अकबर सारखे आक्रमणकर्ते होते, असं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. ते म्हणाले, अकबर आणि मुघल शासक बाबर हे घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. महाराणा प्रताप, शिवाजी महाराज ,गुरु गोविंदसिंग हे खरे हिरो आहेत, असं आदित्यनाथ म्हणालेत. तसंच, लोकांनी खऱ्या इतिहासापासून प्रेरणा घेतली तर आयसीसारख्या संघटनांची भीती वाटणार नाही, असंही ते म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.