मुंबई, 09 ऑक्टोबर : . केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. मात्र, निवडणूक आयोगाने फक्त धनुष्यबाण हे चिन्हचं गोठवलं आहे, शिवसेना हे नाव कायम असणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.
#शिवसेना अंतरिम आदेशाने @ShivSena निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे.
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) October 8, 2022
उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल.शिवसेना नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल.
चुकीची माहिती देऊ नये. @ShivsenaComms
मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. शिवसेना नाव वापरता येईल परंतु, त्याला काही जोडावे लागेल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. तसंच, शिवसेना नावासमोर आता दुसरे एखादे सुटसुटीत नाव जोडावे लागणार आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू हे आयोगानं म्हटलं आहे. अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरणार आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. (बाळासाहेबांसारखा कणखर आवाज, एकनाथ शिंदेंना चॅलेज देणार हा तिसरा ठाकरे?) दरम्यान, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने एक गोष्ट स्पष्ट केलीय की या प्रकरणाचा अंतिम निर्णय आज लागलेला नाहीय. या प्रकरणाची सुनावणी ही सुरुच राहील. त्यासाठी निवडणूक आयोगाने 10 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. पण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला आपापल्या वेगळ्या नावाने निवडणूक लढवावी लागेल. त्यांना निवडणूक आयोगाकडे असलेल्या एकूण 197 चिन्हांपैकी एका चिन्हाची निवड करावी लागले. संबंधित चिन्हे आपण घेऊ इच्छूक आहोत अशी माहिती त्यांना निवडणूक आयोगाला द्यावी लागेल. दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग दोन्ही गटांना त्यांनी निवडलेले चिन्ह मान्य करेल. ( मुंबईत बनावट शपथपत्रांचा मोठा घोटाळा, ठाकरेंना आणखी एक धक्का? ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश : 1) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. २) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. 3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. 4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो आयोगाने मंजूर केलेले आणि; (ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात. त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

)







