जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Shivsena VS Shinde : निवडणूक आयोगाच्या मध्यरात्रीच्या ई-मेलला, शिवसेनेकडून डेडलाईनच्याआधीच खणखणीत उत्तर!

Shivsena VS Shinde : निवडणूक आयोगाच्या मध्यरात्रीच्या ई-मेलला, शिवसेनेकडून डेडलाईनच्याआधीच खणखणीत उत्तर!

आयोगानं सुनावणी घ्यायला पाहिजे होती, आम्हाला अवधी द्यायला पाहिजे होता. एकतर्फी निर्णय आयोगानं घेतला आहे.

आयोगानं सुनावणी घ्यायला पाहिजे होती, आम्हाला अवधी द्यायला पाहिजे होता. एकतर्फी निर्णय आयोगानं घेतला आहे.

आज दुपारी 2 वाजेच्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे वकील सन्नी जैन निवडणूक आयोगात दाखल झाले. जैन यांनी शिवसेनेकडून कागदपत्रांची पुर्तता केली आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे? या संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने ई-मेल केले होते. त्याला आता ठाकरे गटाने वेळेच्या आधी उत्तर दिले आहे. शिवसेनेला २ वाजेपर्यंतची वेळ दिली होती, त्याआधीच 800 पानाचे उत्तर दाखल केले आहे. निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत शिवसेनेला दिलेली डेडलाईन संपली आहे. दुपारी दोन पूर्वी शिवसेनेच्या वकिलांची निवडणूक कार्यालयात हजेरी राहायचे होते. आज दुपारी 2 वाजेच्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे वकील सन्नी जैन निवडणूक आयोगात दाखल झाले. जैन यांनी शिवसेनेकडून कागदपत्रांची पुर्तता केली आहे. निवडणूक आयोगात प्रत्यक्ष भेटून वकिलांनी माहिती दिली. जेव्हा निवडणूक आयोग सांगेल तेव्हा कागदपत्रांची पुर्तता करू, ठाकरे गटाने इ रिप्लाय देऊन फाईल केले आहे. (Shivsena VS Shinde : धनुष्यबाण कुणाचं? निवडणूक आयोगाच्या निकालाआधी पवारांचा शिवसेना आणि शिंदेंना सल्ला) गेल्या 24 तासात शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला तब्बल 800 पानांचा रिप्लाय केला आहे. दुपारी दोन पूर्वी शिवसेनेच्या वकिलांची निवडणूक कार्यालयात हजेरी लावली. गेल्या 24 तासात शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला तब्बल 800 पानांचा रिप्लाय दिला आहे. दरम्यान, रविवारी रात्री दोन ई-मेल आल्यामुळे गोंधळ उडाला. निवडणूक आयोगाचे पत्र दिलेले होते. ही मेल आश्चर्यकारक होती. धनुष्यबाण चिन्हाबद्दल साडे चार वाजता उत्तर दिले होते. त्याची पोचपावती दिली ती आमच्याकडे आहे. कागदपत्र मिळाली नाहीत का याची तपासणी करतील. चिन्हाबद्दल २४ तासात उत्तर मागणे हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका अनिल देसाई यांनी केली. (शिवसेनेसाठी आज सर्वात मोठा दिवस, धनुष्यबाणाचा निकाल लागणार) ‘ठाकरे गटाने दिलेलं उत्तर हे अपेक्षाप्रमाणे नाही असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यापूर्वी शिवसेनेची निवडणूक झाली आहे, त्यामध्ये २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे हे अध्यक्ष राहतील. एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्याच्या संख्यकडे पाहावे. अधिकृत सर्व कागदपत्र आहेत. या गोष्टीचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतली अशी अपेक्षा आहे. चिन्ह गोठवण्या संदर्भात कुठेलीही संकेत नाही, असंही देसाई यांनी ठामपणे सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात