‘राजीव गांधी मॉब लिंचर’; भाजप मित्रपक्षाच्या प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता भाजप मित्रपक्षाच्या प्रवक्त्यानं वादग्रस्त विधान केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 01:02 PM IST

‘राजीव गांधी मॉब लिंचर’; भाजप मित्रपक्षाच्या प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

चंदिगड, 06 मे : 'तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपल्याचं' विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे बोलताना केलेल्या विधानानंतर नरेंद्र मोदींवर देखील नेटकऱ्यांनी टीका केली.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याचा वाद ताजा असताना आता भाजपच्या मित्रपक्षाच्या प्रवक्त्यानं देखील ‘राजीव गांधी मॉब लिंचर’ असल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून देखील आता मोठा वाद निर्माण झाला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते मनजिंदर सिंह सिरसा यांनी रविवारी राजीव गांधी भारताचे सर्वांत मोठे मॉब लिंचर होते. ज्यांनी एका समाजाविरोधात मॉब लिंचिंगची योजना बनवली होती असं वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून देखील आता वाद निर्माण झाला आहे.

त्यांच्या या विधानाचा संदर्भ हा शीख दंगलीशी आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांना आता वेग चढला असून जुन्या प्रकरणांचा देखील आता वापर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोफर्स घोटाळ्याचा संदर्भ लावत राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर 1 म्हटलं होतं.


लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांसाठी हा आहे भाजपचा मास्टरप्लॅन

Loading...

राहुल गांधींचं प्रत्युत्तर

"तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला," असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी, असं ट्विट केलं होतं. दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते मनजिंदर सिंह सिरसा यांच्या विधानावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


VIDEO: '...पण जबरदस्तीनं पंजाचं बटण दाबायला लावलं' आजीबाईंचा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 01:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...