मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Shivsena Symbol Crisis : शिवसेनेच्या नव्या चिन्हाच्या मार्गातही शिंदे गटाचा खोडा, निवडणूक आयोग 'ते' चिन्हं नाकारणार?

Shivsena Symbol Crisis : शिवसेनेच्या नव्या चिन्हाच्या मार्गातही शिंदे गटाचा खोडा, निवडणूक आयोग 'ते' चिन्हं नाकारणार?

शिंदे आणि ठाकरे गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे आणि ठाकरे गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे आणि ठाकरे गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता दुसऱ्या चिन्हासाठी चढाओढ सुरू आहे. पण, शिवसेनेनं जे चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केली होती, तीच चिन्ह आम्हालाही मिळावी अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेनं मागितलेली चिन्ह नाकारली जाण्याची शक्यता आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे शिवसेनेनं दुसरं चिन्ह मिळवण्यासाठी तयारी केली.  त्रिशूळ, उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल. तीन नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवली. त्यातील पहिलं नाव हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, तिसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे", असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शिवसेनेकडून ही तिन्ही नावं आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे.

पण,  उगवता सूर्य आणि त्रिशूळ दोन्ही चिन्ह नाकारली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग दोन्ही चिन्ह नाकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

('धनुष्यबाण गोठवल्याची बातमी समजल्यावर उद्धव ठाकरे रडले')

शिंदे आणि ठाकरे गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे एकाच वेळी जर एकाच चिन्हावर दोन्ही गटाने दावा केला तर चिन्ह बाद केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान,  शिंदे गटाचीही रविवारी रात्री बैठक झाली असून यात निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असल्याचं समोर आलं आहे.

(ठाकरेंपाठोपाठ आता शिंदे गटाकडे या 3 चिन्हांचा पर्याय, आज दोन्ही गटाच्या नावाचाही होणार फैसला)

निवडणूक आयोगाला कोणती तीन नावं आणि तीन चिन्हं सादर करायची याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. सोमवारी म्हणजेच आज शिंदे गट याबाबत पत्रक काढून आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. अशात आता दोन्ही गटांना कोणतं चिन्ह आणि नाव मिळणार याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे.

दरम्यान,  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील कायदे विभाग या3  पर्यायाच्या प्रस्तावावरती विस्ताराने चर्चा करू आजच निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos