मुंबई, 17 ऑक्टोबर : सध्या महाराष्ट्राचं राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालं आहे. त्यात ईडी हाही मुख्य मुद्दा आहे. शरद पवारांनी निर्देश दिल्यानंतर पात्रता नसतानाही काही बँकांना कर्ज देण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी न्यूज१८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावर आता पवारांनी उत्तर दिलं आहे. मी कधीही कोणत्याही संस्थेला पत्र दिलेलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जर मी पत्र दिलं असेल तर त्याची चौकशी व्हावी असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. खरंतर निवडणुकीच्या तोंडावर राज्यातलं वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटाला शरद पवारांचं उत्तर देत न्यूज१८ लोकमतला खास मुलाखत दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप खोटे असून मी कोणतीही पत्रं संस्थेला दिली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता काय खरं हे येणारा काळच सांगेन. जिल्हा बँकांना आर्थिक सहाय्य करण्याची जबाबदारी नाबार्डची आहे. अडचणीत आलेल्या बँकांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नाबार्डनं काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. राज्य सहकारी बँकेनं याच गाईडलाईन्सच्या आधारावर काही संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला. पण मी बँकेचा संचालक नाही. त्यामुळे मी बँकेच्या निर्णयप्रक्रियेशी संबंधित नाही. तर ज्या संस्थांना पैसे दिले त्यांच्याशी माझा संबंध नसल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत. इतर बातम्या - भाजपचं ठरलंय! ‘हे’ असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज18 लोकमतवर मोठा गौप्यस्फोट केला होता. - पात्रता नसतानांही पवारांचा निर्देशानुसार देण्यात आले कर्ज - पत्राचा आधार घेत शिखर बँकेनी वाटली कर्जाची खिरापत - ‘काही ठरावांमध्ये पवारांचा थेट उल्लेख’ - ‘पवारांचे हे काम गुन्हेगारी स्वरुपाचे आहे की नाही हे चौकशीनंतर पुढे येईल’ VIDEO : ‘… म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.