अमरावती, 26 ऑगस्ट: बी टेक केल्यानंतर अमेरीकेत सायंटिस्ट म्हणून नोकरी केल्याचे सांगून एका ठगानं अमरावती शहरातील एका तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भामट्यानं पीडित तरुणीची आर्थिक फसवणूक देखील केलाचं उघडकीस आलं आहे. ही घटना शहरातील गाडगे नगर हद्दीत घडली आहे. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ (रा. संतोषनगर, हैदराबाद, राज्य तेलगंणा) याच्याविरुध्द लैंगिक शोषणासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. हेही वाचा… मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांची अखेर बदली, अनेक बड्या अधिकाऱ्यांनाही हलवलं मिळालेली माहिती अशी की, आरोपी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ यानं ‘जीवनसाथी’ या विवाह नोंदणी वेबसाईटवर तरुणीशी संपर्क साधला. हैदराबाद येथील शेख शुभान याने अविवाहित असल्याचं सांगून पीडितेला विवाहाचा प्रस्ताव दिला होता. आपण बी टेक केल्यानंतर सायंटिस्ट म्हणून अमेरीकेला नोकरी केली आहे. त्यामुळे तरुणीने शेख शुभानची सगळी माहिती तपासून लग्नाचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर 2 महिन्यातच सुभानचा मोबाईल हाती लागला असता त्याचे अनेक तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो दिसले. यामुळे तरुणी अमरावतीला निघून आली. तिनं आरोपीच्या विरोधात गाडगे नगर पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याने यापूर्वी हैद्राबाद, बंगळुरू, तामिळनाडू, अलिगढ, कोलकाता येथील 7 तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. शेख सुभान याच्याविरुद्ध हैदराबाद येथे बलात्कार व 7 मोबाईल चिटिंगचे गुन्हे दाखल आहेत. हेही वाचा… राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा, उद्धव ठाकरेंना दिलं पत्र अमरावतीतील गाडगे नगर पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.