जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जैसलमेरमध्ये वाळूचं भयंकर वादळ; सोनार किल्लाही झाला अदृश्य, पाहा VIDEO

जैसलमेरमध्ये वाळूचं भयंकर वादळ; सोनार किल्लाही झाला अदृश्य, पाहा VIDEO

जैसलमेरमध्ये वाळूचं भयंकर वादळ; सोनार किल्लाही झाला अदृश्य, पाहा VIDEO

अचानक आलेल्या या वाळूच्या वादळामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

जैसलमेर, 5 ऑगस्ट :  आज सायंकाळी जैसलमेरमध्ये धुळीचं वादळ आल्याने मोठी खळबळ उडावी. वाळूच्या वादळामुळे संपूर्ण शहर वाळून झाकोळून गेले होते. शहरातील प्रसिद्ध सोनार किल्लाही या वादळात दिसेनासा झाला होता. यामुळे शहरातील नागरिक पुरते घाबरले होते. शहराजवळील हॉटेल सुर्यगढ येथील आमदारही या वादळाने त्रस्त झाले होते. जैसलमेरमधील या वाळूच्या भल्यामोठ्या डोंगरामुळे लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.

जाहिरात

अद्याप राजस्थानमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यात नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असताना बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये घबराट झाली. त्यात आज जोधपूर आणि जालोर जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. जैसलमेरमध्ये दिवसभर सुरू असेल्या भीषण उन्हाळ्यानंतर सायंकाळी येथील नागरिकांना वाळूच्या वादळाचा सामना करावा लागला. त्यानंतर काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. काही काळासाठी लोकांना डोंगरावरील काहीच दिसत नव्हतं. जोरदार वाऱ्यासह वाळूचे वादळ पुढे ढकलले गेले. त्यानंतर काही काळानंतर वातावरण पूर्ववत झाले. त्यानंतर काही ठिकाणी झालेल्या रिमझिम पावसामुळे लोकांना दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या या वादळामुळे लोकांमध्ये काही काळासाठी घबराट पसरली होती. काही काळ समोरील डोंगरही दिसत नव्हता. सध्या येथील वातावरण स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rajasthan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात