मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

संजय राऊत सुशांतला 'हा' रोल करणार होते ऑफर, पण...

संजय राऊत सुशांतला 'हा' रोल करणार होते ऑफर, पण...

माध्यमं, सोशल मीडिया आणि इतर शक्य तितक्या सगळ्या ठिकाणी सुशांतच्या आत्महत्येविषयी चर्चा सुरू आहे. वेगवेगळे तर्क लावून शोध सुरू आहे. अशात आणखी एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

माध्यमं, सोशल मीडिया आणि इतर शक्य तितक्या सगळ्या ठिकाणी सुशांतच्या आत्महत्येविषयी चर्चा सुरू आहे. वेगवेगळे तर्क लावून शोध सुरू आहे. अशात आणखी एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

माध्यमं, सोशल मीडिया आणि इतर शक्य तितक्या सगळ्या ठिकाणी सुशांतच्या आत्महत्येविषयी चर्चा सुरू आहे. वेगवेगळे तर्क लावून शोध सुरू आहे. अशात आणखी एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

मुंबई, 28 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूर (Sushant singh Rajput ) आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी सुशांतच्या ज्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या त्यातून बरीच माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यात माध्यमं, सोशल मीडिया आणि इतर शक्य तितक्या सगळ्या ठिकाणी सुशांतच्या आत्महत्येविषयी चर्चा सुरू आहे. वेगवेगळे तर्क लावून शोध सुरू आहे. अशात आणखी एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

सुशांतने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा सहा चित्रपट निर्मात्यांशी त्याचा करार झाला होता. धोनी चित्रपटात त्याने उत्तम काम केलं आणि सिनेमाही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर त्याच्या नावाची आणखी चर्चा झाली. यावेळी ठाकरे सिनेमाची निर्मिती संपली आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचं ठरलं. त्यावेळी जॉर्ज यांची भूमिका करणाऱ्या चेहऱ्यांची शोधाशोध सुरू झाली. त्यात सुशांतच्या नावावरदेखील विचार करण्यात आला असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

सुशांत हा त्यांच्या नजरेत होता. तो एक उत्तम अभिनेता असून त्याच्या कामावर सगळ्यांचं प्रेम होतं. त्यामुळे जॉर्ड फर्नांडिस यांच्या बायोपिकसाठी सुशांतच्या नावाचा विचार करण्यात आला. पण यावेळी दोन दिवसांनी संजय राऊत यांना धक्कादायक माहिती मिळाली होती. सुशांत एक गुणी अभिनेता असला तरी तो सध्या मानसिक तणावाखाली असल्याचं संजय राऊत यांना सांगण्यात आलं.

सुशांत सध्या डिप्रेशनमध्ये आहे. सिनेमाच्या अनेक सेटवर त्याने अनेक वेळा विचित्र वागणूक केल्याचंही समोर आलं. याचा सगळ्यांना त्रास होतो. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनी याच कारणामुळे त्याच्याशी करार मोडला असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सुशांतसारखे सच्चे अभिनेते त्यांच्या कलागुणांमुळे मोठे होतात. प्रगतीची उंच शिखरं गाठतात. पण हिंदी सिनेसृष्टीत काही 4-5 लोकांनी तळ ठोकला आहे, हे सुद्धा खरं आहे. पण त्यामुळे सुशांतने आत्महत्या केली हे म्हणणं योग्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले. कारण, जर आपण असा विचार केला तर दिवसाला एक अभिनेता आपलं आयुष्य गमावेल.

सुशांतला जाऊन आज 14 दिवस झाले तरी या दु:खातून त्याचा मित्रपरिवार, सहकलाकार, चाहते सावरले नाही आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांचे, त्याच्या वडिलांचे दु:ख तर अनाकलनिय आहे. दरम्यान या सगळ्या घटनांमध्ये सुशांतच्या कुटुंबीयांनी मोठ्या धैर्याने एक निर्णय घेतला आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Sushant sing rajput, Sushant Singh Rajput