सांगली, 03 आॅगस्ट : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी दोन्ही पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवली. तर भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवणे पसंत केले. त्यामुळे सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 62 टक्के मतदान झालंय. सांगलीत 11 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. एकूण 11 ठिकाणी प्रमुख लढती आहे. तर एक परंपरागत लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपसह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. प्रमुख लढती १) महापौर हारुण शिकलगार ( काँग्रेस ) विरूद्ध अपक्ष राजेश नाईक, ( अपक्ष ) आसिफ बावा- प्रभाग १६ २) युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण विरुद्ध भाजप रणजित पाटील ( खा. संजयकाकांचे नातेवाईक) - प्रभाग १५ ३) राष्ट्रवादी इद्रीस नायकवडी विरुद्ध करण जामदार काँग्रेस प्रभाग - ५ मिरज ४) राष्ट्रवादी अतहर नायकवडी विरुद्ध अल्लाऊद्दीन काझी अपक्ष. प्रभाग - ६ ५) भाजप संदीप आवटी-शिवाजी दुर्वे विरुद्ध काँग्रेस सचिन जाधव, अजित दोरकर. प्रभाग - ३ ६) भाजप निरंजन आवटी विरुद्ध अपक्ष अनिल कुलकर्णी. प्रभाग - ४ ७) काँग्रेस किशोर जामदार विरुद्ध गणेश माळी भाजप प्रभाग - ७ ८) काँग्रेस संतोष पाटील विरुद्ध अपक्ष अतुल माने - प्रभाग ९ ९) भाजप महेद्र सावंत विरुद्ध राष्ट्रवादी राजू गवळी-प्रभाग १८ १०) भाजप युवराज बावडेकर विरुद्ध स्वाभिमानी विकास आघाडी शिवराज बोळाज 11) गेल्या पंधरा वर्षांपासून परंपरागत लढत प्रभाग- १४ मध्ये पैलवान सुब्राव मद्रासी - भाजप विरुद्ध पैलवान बाळासाहेब गोंधळे -स्वाभिमानी विकास आघाडी १2) भाजप अंजिक्य पाटील विरुद्ध. काँग्रेस दिलीप पाटील प्रभाग १३ सांगली महापालिका निवडणूक 2018 साठी एकूण 78 जागासाठी 451 उमेदवार निवडणूक रिंगणात काँग्रेस - 44 राष्ट्रवादी - 34 काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीआघाडी - 78 भाजपा - 78 शिवसेना - 56 अपक्ष विकास महाआघाडी - 43 स्वाभिमानी विकास आघाडी - 20 सांगली जिल्हा सुधार समिती - 21 हम भारतीय पार्टी - 3 एम आय एम - 8 पक्षीय बलाबल काँग्रेस - ४१ राष्ट्रवादी - १९ स्वाभिमानी आघाडी - ८ मनसे -१ जनता दल - १ अपक्ष - ८
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.