मुंबई, 02 जून- बॉलिवूडचे कट्टर चाहते आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांचे चाहते यात खूप फरक आहे. दाक्षिणात्य सुपरस्टारचे चाहते त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. असंच काहीसं एका चाहत्याने आपल्या आवडत्या स्टारसाठी केलं आहे. त्या चाहत्याने आपल्या सुपरस्टारच्या सिनेमाचं एक तिकीट तब्बल १ लाख रुपयाला विकत घेतलं. दाक्षिणात्य सुपरस्टार अंबरीश यांचं गेल्यावर्षी २४ नोव्हेंबरला निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अंबरीश यांचा मुलगा अभिषेकने अमर सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात अंबरीश यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. जान्हवी कपूरच्या शॉर्ट्सवर कतरिनाची कमेंट, सोनम कपूरने दिलं उत्तर Sacred Games च्या बंटीला क्रिकेट खेळताना लागला बॉल आणि नंतर… निधनापूर्वी अंबरीश यांनी सिनेमात छोटेखानी भूमिका साकारली होती. याचमुळे त्यांच्या एका चाहत्याने अमर सिनेमाच्या पहिल्या शोचं पहिलं तिकीट १ लाख रुपयाला विकत घेतलं. या अवलियाचं नाव आहे मंजूनाथ. मंजूनाथ हा देवनगरीचा राहणारा असून त्याने तब्बल १ लाख रुपयाचा धनादेश देऊन सिनेमाचं पहिलं तिकीट घेतलं. त्याने हा धनादेश सिनेमाच्या प्रोडक्शन हाउसच्या नावाने दिला आहे.
अभिनयाशिवाय ‘या’ क्षेत्रातही काम करते सोनाक्षी सिन्हा अमर सिनेमाचं दिग्दर्शन नागशेखर यांनी केलं असून अंबरीशबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘सुपरस्टार अंबरीश यांच्यासोबत एक सीन करण्यात मला यश मिळालं. हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा सीन होता. त्यांनी आपल्या मुलाच्या सिनेमाचा पूर्वार्ध पाहिला होता. सिनेमात एका बायकरची कथा दाखवण्यात आली असल्यामुळे त्यांच्या मुलाने उत्तमरित्या बाइक चालवली की नाही हे जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता होती.’ VIDEO: नाशिकच्या गोदावरीत अजय देवगणने केलं वडिलांचं अस्थी विसर्जन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.