मुंबई, 27 जुलै : महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक घरात उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi) हे समीकरण ठरलेलं आहे. साबुदाणा खिचडी खायला मिळेल म्हणून उपवास करणारे अनेक जण सापडतील. उपवासासाठी सर्वांत आवडता पदार्थ असलेला साबुदाणा हा वजन वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. साबुदाणा सहज पचणारा पदार्थ आहे. तसंच यामध्ये कार्ब्ज, एनर्जी आणि स्टार्च हे घटक असतात. त्यामुळे जर तुमचं वजन कमी असेल तर तुम्ही साबुदाण्याचा दैनंदिन आहारात समावेश करू शकता. साबुदाणा खाल्ल्याने वजन (Sabudana for weight gain) वाढण्यास मदत होते. या संदर्भात ओन्ली माय हेल्द डॉट कॉमने माहिती दिली आहे.
साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतं. यासोबतच साबुदाणामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. तसंच त्यात कॅल्शियम, फायबर आणि लोहदेखील अल्प प्रमाणात आढळतं. 100 ग्रॅम साबुदाणामध्ये प्रोटिन 0.2 ग्रॅम, फॅट 0.2 ग्रॅम, कार्बोहायड्रेट 87 ग्रॅम आणि 351 ग्रॅम ऊर्जा इतकी पोषक तत्त्वं आढळतात. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आणि फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी ते फायदेशीर मानलं जातं. साबुदाण्यामध्ये स्टार्च मुबलक प्रमाणात असल्याने वजन वाढण्यास मदत होते. सहज पचणारे पदार्थ वजन वाढवण्यास अधिक मदत करतात, असं डॉक्टर सुगीता सांगतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही साबुदाण्याचं सेवन सुरू करायला हवं.
साबुदाण्याचं सेवन कसं करायचं?
साबुदाणा खिचडी
तुम्हाला वजन वाढवण्यासाठी साबुदाण्याचं सेवन करायचं असेल तर तुम्ही त्याची खिचडी (Sabudana Khichdi) तयार करून खाऊ शकता. साबुदाणा खिचडी सहज पचते आणि त्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागते. साबुदाणा खिचडी हेल्दी आहे, यामध्ये तुम्ही पौष्टिक भाज्या घालून त्याचं सेवन करू शकता.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
साबुदाणा सूप
सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही साबुदाणा सूप (Sabudana Soup) पिऊ शकता. यासाठी साबुदाणा काही तास पाण्यात भिजवून ठेवा, टोमॅटोची प्युरी बनवा आणि गाजराचे लहान तुकडे करा. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात गाजर आणि टोमॅटो (Tomato) प्युरी घाला. यानंतर पाणी, मीठ, काळी मिरी घाला आणि 15 मिनिटे उकळून घ्या. आता तुम्ही हे गरमागरम सूप पिऊ शकता.
हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा
साबुदाणा खीर
तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer) बनवून खाऊ शकता. यासाठी साबुदाणा काही तास भिजत ठेवावा. यानंतर दूध गरम करून त्यात एक वाटी साबुदाणा घालून चांगला शिजवा. जर तुम्ही जेवणाच्या वेळी साबुदाणा खीर बनवून खात असाल तर त्यात बदाम, काजू आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्स टाकता येतील. त्यामुळे साबुदाणा खीर आणखी पौष्टिक होईल.
अशा रितीने वजन वाढवण्यासाठी तुम्ही साबुदाण्यापासून खीर, खिचडी किंवा सूप बनवू शकता. याचा तुमचं वजन वाढण्यास फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Weight, Weight gain