Home /News /news /

'मोदीजी, हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यो भेजी?' प्रियांका गांधींनी सुरू केली नवी मोहीम

'मोदीजी, हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यो भेजी?' प्रियांका गांधींनी सुरू केली नवी मोहीम

Vaccine poster Agitation नवी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोस्टर लावलेले आढळून आले. त्यावर मोदीजी आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठवल्या? असा सवाल करणारा हिंदीतील मजकूर होता.

    नवी दिल्ली, 16 मे : देशात मोठ्या प्रमाणावर कोरोनावरील लसीचा (Corona Vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकार (Center) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (PM Narendra Modi) टीका होत असताना दिसत आहे. दिल्लीत काही आंदोलकांनी आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठवल्या असे काही पोस्टर (Poster in New Delhi) दिल्लीत लावले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत 12 जणांना अटक केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनं याला आंदोलनाचं (Congress Campaign) स्वरुप दिलं आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी याच फलकाचे फोटो ट्विटरच्या प्रोफाईलवर लावले आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही हेच पाऊल उचललंय. (वाचा-Black Fungus कसा पसरतोय? बचावासाठी काय कराल? AIIMS च्या प्रमुखांनी दिली माहिती) देशभरात कोरोनाच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घ्यायलाही प्रचंड उशीर होत असल्याचं त्यामुळं समोर येतंय. महाराष्ट्रात तर 18-44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेकच लागला आहे. या सर्व मु्द्द्यांवरून केंद् सरकारवर विविध आरोप होत आहेत. देशातील नागरिकांना लस नसताना विदेशामध्ये लसींचे डोस का पाठवले असा सवालही मोदींना विचारला जात आहे. मात्र आता त्यावरून एक मोठा वाद उभा राहिला आहे. नवी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोस्टर लावलेले आढळून आले. त्यावर मोदीजी आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठवल्या? असा सवाल करणारा हिंदीतील मजकूर होता. मात्र या पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी तब्बल 21 गुन्हे दाखल केले. 12 जणांना अटक करण्यात आली तसेच शेकडो पोस्टरही जप्त केले. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. (वाचा -कोरोनाने जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC पास झालेल्या तरुणाचा मृत्यू) काँग्रेसनं मात्र आता याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विटर प्रोफाईलवर या पोस्टरचा फोटो लावला आहे. राहुल गांधी यांनी हा फोटो पोस्ट करत मलाही अटक करा असं आव्हान सरकारला केलं आहे. प्रियंका गांधी यांनीही असेच पोस्टर प्रोफाईलवर लावले आहे. त्यानंतर काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्तेही असेच प्रोफाईल पिक लावत आहेत. एकूणच कोरोना लसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने येत आहे. काँग्रेस आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: AIIMS, Corona vaccine, Coronavirus, Delhi Police

    पुढील बातम्या