मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Black Fungus : कसा पसरतोय हा जीवघेणा आजार, बचावासाठी काय कराल? AIIMS च्या प्रमुखांनी दिली माहिती

Black Fungus : कसा पसरतोय हा जीवघेणा आजार, बचावासाठी काय कराल? AIIMS च्या प्रमुखांनी दिली माहिती

Black Fungus: एम्‍स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सांगितलं की, स्टेरॉईडचा चुकीचा वापर हे या आजाराच्या संसर्गामागील मोठं कारण आहे.

Black Fungus: एम्‍स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सांगितलं की, स्टेरॉईडचा चुकीचा वापर हे या आजाराच्या संसर्गामागील मोठं कारण आहे.

Black Fungus: एम्‍स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सांगितलं की, स्टेरॉईडचा चुकीचा वापर हे या आजाराच्या संसर्गामागील मोठं कारण आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्‍ली, 16 मे : देशामध्ये सध्या कोरोनाच्या महामारीबरोबरच (Coronavirus) ब्लॅक फंगस (Black Fungus) या जीवघेण्या आजारानंही थैमान घातलं आहे. अतिशय वेगानं हा आजार पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराचं नाव आहे म्‍युकरमाइकोसिस (Mucormycosis). दिल्‍लीमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी याबाबत अधिक सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, डायबेटीजच्या रुग्णांनां कोरोनाची लागण झालेली असेल आणि त्यांना स्टेरॉइड्स दिले जात असतील, तर त्यांना ब्लॅक फंगसचं संक्रमण होण्याचा धोका सर्वाधिक आहे.

(वाचा-कोरोनाने जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC पास झालेल्या तरुणाचा मृत्यू)

डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, म्‍युकरमाइकोसिसचे विषाणू माती, हवा आणि अगदी जेवणातही आढळतात. पण ते फार प्रभावी नसतात. त्यांच्याद्वारे साधारणपणे संसर्ग पसरत नसतो. कोरोनाच्या संकटाच्या आधी या संसर्गाची प्रकरणं अत्यंत कमी होती. पण आता कोरोनाच्या संकटामुळं याचेही रुग्ण मोठ्या संख्येनं समोर येऊ लागले आहेत.

डॉ. गुलेरिया यांनी स्टेरॉईडचा अत्यंत बेजबाबदारपणे वापर करणं, हे या संक्रमणामागील कारण असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी रुग्णालयांना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठरवून दिलेल्या उपचाराच्या प्रोटोकॉलचं पालन करण्याची विनंतीही केली आहे. त्याचं कारण म्हणजे कोरोनाच्या रुग्णांमध्ये याचा संसर्ग अधिक वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याचा मृत्यूदर अत्यंत प्रचंड असा आहे.

(वाचा-कोरोनाबाबत सरकारनं दिली Good News, मात्र ब्लॅक फंगसनं वाढवली चिंता)

गुलेरिया म्हणाले की, स्टेरॉईडचा गैरवापर यामागचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी स्टेरॉईडचा चुकीचा वापर थांबवायला हवा, असंही ते म्हणाले. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, एम्‍समध्ये ब्लॅक फंगसचे 23  रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 20 अजूनही कोरोनाग्रस्त आहेत. तर अनेक राज्यांमध्ये या रुग्णांचा आकडा 500 वर पोहोचला आहे.

गुलेरियांच्या मते, ब्लॅक फंगस चेहरा, नाक, डोळे आणि मेंदूवर हल्ला करतो. त्यामुळं अंधत्व येण्याची भीती असते. फुफ्फुसांमध्येही त्याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. तर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटलं आहे की, डॉक्टरांनी रुग्णांच्या चेहऱ्याच्या एका बाजुला सायनसच्या वेदना किंवा नाक बंद होणे अशा प्राथमिक लक्षणांवर नजर ठेवावी. फंगसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी डोकेदुखी, सूज येणं, संवेदना जाणं, दातांमध्ये वेदना किंवा दात ढिले होणं यावर नजर ठेवायला हवी.

First published:

Tags: AIIMS, Coronavirus