Home /News /news /

पुण्यात डॉक्टरसह संपूर्ण कुटुंबालाच झाली कोरोनाची लागण, पोलीस कर्मचारीही निघाला पॉझिटिव्ह

पुण्यात डॉक्टरसह संपूर्ण कुटुंबालाच झाली कोरोनाची लागण, पोलीस कर्मचारीही निघाला पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

एका पोलीस कर्मचाऱ्यासह पीएमसीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

    पुणे, 18 एप्रिल : पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. ससून रूग्णालयाच्या डॉक्टरसह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. एकाच कुटुंबातील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तसंच एका पोलीस कर्मचाऱ्यासह पीएमसीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात काल दिवसभरात 59 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर करोनाबाधित चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 65 वर्षांची महिला, 30 वर्षाचा तरुण आणि 44 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. मृत व्यक्तींना विविध आजार होते, अशी माहिती आहे. त्यातच कोरोनाची बाधा झाल्यानंतर अवयव निकामी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू आहे. पुण्यात अजून दहा क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चार रुग्ण ससूनमध्ये तर इतर सहा जणांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यातून एक दिलासादायक बातमी पुण्यातील डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 256 रुग्णांवर उपचार आहेत. महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले चौघे करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना हा काहीसा दिलासा मिळाला आहे. हेही वाचा- 40 वर्ष ज्याच्यासोबत संसार केला, त्याला शेवटचं पाहू शकली नाही पत्नी, VIDEO कॉलवर अंत्यदर्शन घेण्याची वेळ दरम्यान, पुण्यात कोरोनाचा धोका कायम असतानाही शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 7 हजार 361 नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून 23 हजार 900 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 144 नुसार 24 हजार 7 38 जणांस नोटीसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पुण्यात असल्याचे आढळून आले आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Pune news

    पुढील बातम्या