लज्जास्पद! प्रियकरासोबत आईने लेकीला दाखवले PORN VIDEO, पुण्यातला भयंकर प्रकार

लज्जास्पद! प्रियकरासोबत आईने लेकीला दाखवले PORN VIDEO, पुण्यातला भयंकर प्रकार

आईचा प्रियकर रोज अश्लील VIDEO दाखवून पीडितेसोबत करायचा धक्कादायक वर्तन

  • Share this:

शिरूर, 13 ऑगस्ट : "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" "ही म्हण सर्वांना माहित आहे. पोटच्या मुलांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक माताही समाजात पहायला मिळतात. परंतु स्वतःच्या प्रियकरासाठी स्वतःच्याच पोटच्या अल्पवयीन मुलीला दुष्कृत्य करण्यास भाग पडणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराविरोधात अश्लील व्हिडिओ दाखवत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्या प्रकरणी पुण्यातील शिरुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिरुर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

शिरुर शहरातली ही घटना आहे. पीडित मुलीच्या आईचा प्रियकर विजय पाटील याचे कायम त्यांच्या घरी येणं-जाणं होतं. पीडित मुलीची आई आणि तिचा प्रियकर हे दोघे नेहमी घरात दारू पिऊन अश्लील कृत्य करायचे. यावेळी विजय पाटील हा पीडितेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत 'तुझी आई व मी हे करतो. ते तू माझ्यासोबत कर, तुला मजा येईल' असं म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करायचा. याबाबत मुलगी प्रतिसाद देत नसल्याने या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितलं तर तुला मारुन टाकीन अशी धमकी देखील देत होता.

15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

पीडितेची आई मुलीला तिचा प्रियकर विजय पाटील हे तुझे वडील आहेत. तू त्यांना पप्पा म्हणत जा आणि ते तुला जसे म्हणतात तू तसे करत असे सांगत होती. याबाबत आई व आईच्या प्रियकराकडून होणारे अत्याचार असह्य होऊ लागल्याने पीडित मुलीने तिच्या आत्याला याबाबत सर्व सांगितलं. त्यानंतर पीडित मुलीच्या आत्याने शिरुर पोलीस स्टेशन इथे फिर्याद दिली.

BREAKING: मुंबईत इमारत कोसळली, 1 ठार तर 4 जण गंभीर जखमी

शिरुर पोलिसांनी तातडीने पीडित अल्पवयीन युवतीची आई आणि तिचा प्रियकर विजय अर्जुन पाटील (रा. खारमळा, शिरुर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. तर या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी इतर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 13, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या