Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये पोलीस गर्भवतीच्या मदतीसाठी धावला; प्रसुतीनंतर महिलेने बाळाला दिलं त्याचं नाव

लॉकडाऊनमध्ये पोलीस गर्भवतीच्या मदतीसाठी धावला; प्रसुतीनंतर महिलेने बाळाला दिलं त्याचं नाव

लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ते दिवस-रात्र ड्यूटी करीत आहेत

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : राजधानी दिल्लीत एका आईने आपल्या नवजात बाळाचे नाव दिल्ली पोलिसातील कॉन्स्टेबलच्या नावावर ठेवलं आहे. कॉन्स्टेबल दयावीर सिंह (Dayavir Singh) हे गर्भवती महिलेच्या मदतीला धावून आले व त्यांनी लॉकडाऊनमध्ये महिलेला सुखरुप रुग्णालयात पोहोचवलं, यानंतर प्रसुती झाल्यावर महिलेने आपल्या बाळाचं नाव दयावीर ठेवलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना दयावीर सिंह म्हणाले, 'मला आनंद आहे की मी त्यावेळी त्यांची मदत करू शकलो. मला खूप चांगलं वाटतंय ' लॉकडाऊनदरम्यान दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मदत केलेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये गर्भवती महिलेले रुग्णालयात पोहोचविण्याव्यतिरिक्त आपल्या जीपमध्ये प्रसूती केल्याची घटनेचा उल्लेख करता येईल. कोरोनाच्या या लढ्यात दिली पोलिसातील अनेक जवान कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने जवानांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना मारत असल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत असले तरी ते आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी आहे. आपण घरी राहत असताना ते मात्र कुटुंबीयांपासून लांब आपली ड्यूटी करीत आहेत. दिल्लीत कोरोनाचा (Coronavirus) कहर दिल्लीत गुरुवारी कोविड – 19 चे 128 नवीन रुग्ण समोर आली आहेत. या व्हायरसच्या संसर्गामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत 2 नवीन कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे. आता दिल्लीत कंटेनमेंट झोनची संख्या वाढून 92 पर्यंत पोहोचली आहे. सध्या कोरोना व्हायरस संसर्गाची संख्या 2376 पर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे देशात आतापर्यंत 724 जणांचा मृत्यू झाला असून कोविड – 19 चे देशातील रुग्णांची संख्या 23452 पर्यंत पोहोचली आहे. संबंधित -तबलिगी जमातशी कनेक्शन; विद्यापीठाने प्राध्यापकाला केलं निलंबित
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या