राज्यात 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यालाही नवे पोलीस आयुक्त

गणेशोत्सव पार पडताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी इतर अधिकाऱ्यांसह 22 जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.

गणेशोत्सव पार पडताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी इतर अधिकाऱ्यांसह 22 जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राज्यात रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल 60 हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर यावेळी अमिताभ गुप्ता हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यांच्या जागी विनीत अगरवाल प्रधान सचिव गृह ( विशेष) हे जागा सांभाळणार आहेत तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती झालेल्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सव पार पडताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी इतर अधिकाऱ्यांसह 22 जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published: