Home /News /news /

Modi@8: धाकट्या भावाकडून तोंडभरुन कौतुक, नरेंद्र मोदी लहानपणापासूनच कष्टाळू आणि हुशार

Modi@8: धाकट्या भावाकडून तोंडभरुन कौतुक, नरेंद्र मोदी लहानपणापासूनच कष्टाळू आणि हुशार

प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) हे नरेंद्र मोदींचे धाकटे भाऊ असून, ते ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे (All India Fair Price Shop Dealers’ Federation) उपाध्यक्ष आहेत.

नवी दिल्ली, 28 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्याच्या गोष्टीला नुकतीच आठ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने न्यूज 18ने गुजरातमध्ये त्यांच्या धाकट्या भावाशी संपर्क साधला आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) हे नरेंद्र मोदींचे धाकटे भाऊ असून, ते ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे (All India Fair Price Shop Dealers’ Federation) उपाध्यक्ष आहेत. अगदी अलीकडेपर्यंत ते एक रेशन दुकान (Ration Store) चालवत होते. प्रल्हाद मोदींनी नरेंद्र मोदींचं बालपण आणि तरुणपणातल्या आठवणींना उजाळा देऊन सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकनही केलं. त्यांच्याशी साधलेल्या संवादातला काही निवडक भाग या ठिकाणी देण्यात आला आहे. - नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षं पूर्ण होत असताना तुम्हाला कसं वाटतं आहे? कुटुंबातले सदस्य म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत. 1970 मध्ये ते सर्व काही सोडून घरातून निघून गेले होते. आता ते संपूर्ण देशाचे पुत्र आहेत. त्या अनुषंगाने आवश्यक ती कर्तव्यं ते पार पाडत आहेत. सध्या ते प्रत्येक भारतीयांचे पालक आहेत. एका गरीब कुटुंबातली ही व्यक्ती आता कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे ते बघा. ते भारताचा अभिमान वाढवत आहेत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Biden) यांनी कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नरेंद्र मोदींनी फक्त कुटुंबाचाच नाही तर भारताचाही अभिमान वाढवला आहे. - मोदी सरकारने सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती केली आहे? ते प्रत्येक भारतीयांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना ‘सबका विकास’ अपेक्षित होता आणि त्यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय असल्याचा अभिमान आहे. - त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगाल का? ते लहानपणापासूनच मेहनती (Hardworking) होते. शिवाय अभ्यासात हुशार होते. त्यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही. ते खूप वेगळे आणि फोकस्ड होते. आम्ही नेहमी त्यांच्याकडे आदर्श म्हणूनच बघायचो. त्यांनी केलेल्या गोष्टींचंच आम्ही अनुकरण केलं. - त्यांच्या सरकारला तुम्ही किती गुण द्याल? पंतप्रधानांच्या सरकारने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. म्हणून मी त्यांना 10 पैकी 10 किंवा त्यापेक्षाही जास्त गुण देईल. त्यांनी कोरोनाची (Corona) समस्या शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. आता भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वांत महत्त्वाचा खेळाडू आहे. - त्यांच्या सरकारला आठ वर्षं पूर्ण होत असताना तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ते निरोगी आणि तंदुरुस्त राहावेत अशी आमची इच्छा आहे. ते भारताचे चिरंजीव आणि भारताचे पालकही आहेत. नागरिकांना त्यांच्याकडून आणखी खूप अपेक्षा आहेत. त्यांचं सरकार आणखी 15 वर्षं राहावं. भारत हे त्यांचं कुटुंब आहे आणि भारताला त्यांची गरज आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Narendra modi, Pm modi

पुढील बातम्या