मुंबई, 06 जून: 'असंच काहीसं घडलं होतं... कदाचित?', असं म्हणत सध्या 'प्लानेट मराठी ओटीटी' (Planet Maratho OTT) प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत असलेली वेब सिरीज म्हणजे रानबाजार (Raanbaazaar Web Series ) वेब सिरीजच्या टिझर आणि ट्रेलरनं सिरीजची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मुख्य भूमिकेत असलेली 'रानबाजार' ही पॉलिटिकल थ्रिलर सिरीज सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. प्राजक्ता आणि तेजस्विनीच्या बोल्ड लुक्समुळे त्यांना प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलं. प्राजक्ता आणि तेजस्विनीच्या बोल्ड सीन्सची चर्चा संपत नाही तर रानबाजारमधील 'कुंडी लगालो सय्या' (Kundi Lagalo Saiyaan Song) या गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. सिरीजमधील हे धमाकेदार आणि बोल्ड गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. वेब सिरीजच्या प्रत्येक भागाच्या शेवटी हे गाणं वाजतं.
रानबाजारच्या पहिल्या तीन एपिसोडला (Raanbaazaar Episode) प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर सिरीजचे पुढचे भाग शुक्रवारी प्रदर्शित झाले आहेत. या भागांनी सिरीजच्या शेवटाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. अशातच 'कुंडी लगालो सय्या' हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड होत असून इन्टाग्रामवर 'कुंडी चॅलेंज' (Kundi Challenge) पहायला मिळत आहे. अभिनेत्री 'माधुरी पवार' (Madhuri Pawar) हिनं 'कुंडी लगालो' या गाण्यावर तिच्या बोल्ड लूक आणि अदांसह डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. माधुरी उत्तम डान्सर आहेच पण यावेळी तिचा बोल्डनेस पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच फिदा झालेत.
'कुंडी लगालो सय्या' हे गाणं फार वेगळं असून त्याच्या दमदार म्युझिकनं गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाला ठेका धरायला लावत आहे. हे गाणं डॉ. पल्लवी श्यामसुंदर ( Dr. Pallavi Shyamsundar) यांनी गायलं असून गाण्याचं शब्द 'अभिजीत पानसे' (Abhijit Panse) यांनी लिहीलं आहेत. तर 'प्रफुल्ल चंद्रा' ( Prafulla Chandra) यांनी गाण्याचं मिक्सिंग केलं आहे.
रानबाजारच्या तगड्या स्टारकास्टमधील एक महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रेरणा पाटील (Raanbaazaar Prerna Patil) अभिनेत्री माधुरी पवार हिनं प्रेरणा उत्तमरित्या साकारली आहे. सिरीजमध्ये माधुरीच्या टक्कल केलेल्या लुकमुळेही तिची प्रचंड चर्चा रंगली होती. सिरीजमध्ये दमदार भूमिका आणि आता कुंडी लगाओ सय्या गाण्यावर माधुरीचा डान्स पाहून चाहते चांगलेच चक्रावून गेलेत. माधुरीच्या दोन वेगळ्या शेड्स यात पाहायला मिळाल्यात.
माधुरीच्या 'कुंडी लगाले सय्या'वरील व्हिडीओवर कमेंट एका युझरनं म्हटलंय, 'लोक म्हणतात मेल्यानंतर स्वर्गात अप्सरा भेटते, पण तुम्हाला बघून जिवंतपणी स्वर्गातील अप्सरा भेटली', तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, 'जिवात जीव असे पर्यंत फक्त माधुरी'. तर अनेकांनी माधुरीच्या रानबाजारमधील अभिनयाचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.