जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये 10 गाड्यांची जाळपोळ, विकृतीचा थरार कॅमेऱ्यात कैद

VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये 10 गाड्यांची जाळपोळ, विकृतीचा थरार कॅमेऱ्यात कैद

VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये 10 गाड्यांची जाळपोळ, विकृतीचा थरार कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून तरुणाने या गाड्या जाळल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    पिंपरी-चिंचवड, 13 जानेवारी: नव्या वर्षातही गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्याच्या घटना थांबवण्याचं नाव घेत नाहीत 1 जानेवारीनंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड परिसरात थरारक घटना समोर आली आहे. साखर झोपेत असताना एका तरुणानं सोसायटीत पार्क असलेल्या गाड्यांना आग लावल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ कदाचित मन विचलित करू शकतो मात्र या घटनेत तरुणाची विकृत मानसिकता किती असू शकते ते हा व्हिडीओ पाहून समजू शकतं. पिंपरी चिंचवडमध्ये ओम गणेश सोसायटीमध्ये सर्व झोपले असताना रात्री उशिरा एक तरुण शिरला त्यानं तिथे पार्क केलेल्या गाड्यांना आग लावली आणि पळ काढल्या. यामध्ये आगीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास 10 गाड्या जळून गेल्यानं मोठा संताप व्यक्त केला जात आहे. गाड्यांना आग लावणारा तरुण सोसायटीला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे कृत्य करताना कैद झाल्यानं खळबळ उडाली आहे.

    जाहिरात

    मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून तरुणाने या गाड्या जाळल्या आहेत. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. हे वाचा- Petrol Diesel Rates: पुण्यात सलग 3 दिवस पेट्रोल नव्वदीपार! मुंबईतही इंधनाचा भडका नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारीला उद्योगनगरीत गुन्हेगारांनी गाड्यांची तोडफोड केली होती. तर मागच्या वर्षी 2020मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांकडे दाखल असलेल्या आकडेवारी नुसार मागील वर्षभरात गुंडांनी केलेल्या तोडफोडीत सुमारे 348 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असल्यानं दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तर ओम गणेश सोसायटीमध्ये घडलेल्या प्रकरणात आरोपीविरोधात पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात