मुंबई : देशभरात दिवाळीचा उत्साह सुरू आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि याच दरम्यान एक मोठी आणि वाईट बातमी येत आहे. एक मोठी कंपनी आपले जवळपास 4 हजार कर्मचारी कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे 4 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. CNBC ने दिलेल्या वृत्तानुसार जगातील प्रसिद्ध आणि मोठी कंपनी फिलिप्सने हा मोठा निर्णय घेतला आहे. जगात आर्थिक मंदीचं सावट आहे. जागतिक स्तरावर कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेली महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे कंपनीची ऑपरेशन आणि सप्लाय चेनमधील होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचा-सणासुदीला Loans ऑफरचा फायदा घ्यावा का? तुमचे खरंच पैसे वाचतात की….
फिलिप्सच्या तिमाही निकालांनंतर कंपनीचे CEO रॉय जेकब्स म्हणाले की, उत्पादकता आणि कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळेच आता आम्ही त्या दिशेनं प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनी जागतिक स्तरावर एकूण कर्मचाऱ्यांच्या 5 टक्के म्हणजेच 4000 लोकांना कामावरून नारळ देण्याच्या तयारीत आहे. ‘हा एक कठीण पण अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. कंपनीकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे CEO रॉय यांनी सांगितलं.
दिवाळीत वाढतोय ऑनलाइन सट्टेबाजीचा ट्रेंड, त्यावर किती कर आकारला जातो? वाचा सविस्तरकंपनीने जाहीर केलेल्या तिमाही निकालानुसार कंपनीची एकूण विक्री 5 टक्क्यांनी घटून 430 दशलक्ष युरो झाली आहे. त्याचबरोबर ऑर्डर्स 6 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. याचा फटका कंपनीला मोठ्या प्रमाणात बसला. गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर 60 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. कोरोनानंतर वाढलेली महागाई आणि रुस-युक्रेन युद्धामुळे कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. मागणी कमी झाली आणि खर्च वाढला. कच्च्या मालाचा जास्त वापर यामुळे कंपनी सध्या तोट्यात चालली आहे. या निर्णयामुळे कंपनीला सुमारे 2400 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचे फिलिप्सचे नवे सीईओ रॉय जेकब्स यांचे म्हणणे आहे.