Home /News /news /

महिलांनो, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची पदभरती; अर्ज करण्यासाठी एक दिवस शिल्लक

महिलांनो, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची पदभरती; अर्ज करण्यासाठी एक दिवस शिल्लक

25 जून 2021 ही शेवटची तारीख आहे. आताच अर्ज करा.

    पिंपरी-चिंचवड, 24 जून : महिलांनो तुमच्यासाठी आता नोकरीची आणि सक्षम बनण्याची सुवर्णसंधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Pune Recruitment 2021) मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका (Aasha volunteer) या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. 22 जूनपासून ऑफलाईन अर्ज मागवणात येत आहे. 25 जून 2021 ही शेवटची तारीख आहे. आताच अर्ज करा. एकूण किती जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 मध्ये आशा स्वयंसेविकांसाठी एकूण 106 जागा रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता आशा स्वयंसेविका या पदावर काम करण्यासाठी किमान आठवी पास असणं आवश्यक आहे. यासाठी वयवर्षे 25 ते 45 अशी वयोमर्यादा असणार आहे. हे वाचा -झोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स अर्ज पाठविण्यासाठी पत्ता महानगपालिकेच्या विविध रुग्णालयांत अर्ज पाठवता येणार आहेत. तर मुलाखत घेऊन निवड प्रकिया पार पडणार आहे. रुग्णालयानुसार पदांची संख्या जाहिरातीत सविस्तर देण्यात आली आहे. या पदभरतीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pimpri chinchwad municipal corporation

    पुढील बातम्या