मुंबई, 23 जून : जॉब (Latest Jobs) म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो संघर्ष आणि थकवा. संपूर्ण आठवडाभर काम केल्यानंतर आपण फक्त आणि फक्त सुटीची वाट बघत असतो. मात्र जगातील काही जॉब्स असे आहेत जे करताना तुम्हाला असं कधीच वाटणार नाही. हो आम्ही खरं बोलत आहोत. जगात असे काही जॉब्स (Weird jobs in world) आहेत जे करताना तुम्हाला मजा तर येईलच पण त्यासाठी योग्य ते पैसेही मिळतील. चला तर जाणून घेऊया अशा काही जॉब्सबद्दल.
स्कुबा डायव्हिंग पिझ्झा बॉय (Scuba Diving Pizza Delivery Man)
फ्लोरिडामध्ये पाण्याखाली एक हॉटेल जिथे एका पिझ्झा डिलेव्हरी करणाऱ्या माणसाची गरज असते. यासाठी तिथे नोकरी आहे. हा माणूस स्कुबा डायव्हिंग करत समुद्राच्या आतमध्ये पिझ्झा आणून देतो. यासाठी त्याला पगार मिळतो.
श्वानांच्या अन्नाची चव तपासणे (Dog food taster)
श्वानांच्या अन्नाची चव तपासण्यासाठी जॉब असतात. यामध्ये श्वानाच्या अन्नाची चव बघून ते योग्य आहे का याची पारख करावी लागते. यासठी अनेक लोकांना पैसे मिळतात.
हे वाचा - गूढ गोष्टींचा शोध घेण्याची जिद्द आहे का? मग 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये करा करिअरसापाचं विष घेणे (Snake Milker)
विषारी आणि अतिविषारी सापांच्या शरीरातून विष जमा करणे हाही एक जॉब आहे जो काही हिंमतवान लोकं करतात. सापांच्या शरीरातून विष काढून औषधं बनवण्यासाठी वापरलं जातं. याचसाठी एका अनुभवी माणसाची गरज असते.
Netflix बघणे (Full-time Netflix viewer)
हा जॉब प्रत्येकाच्या स्वप्नातील जॉब असू शकतो. दिवसभर आपल्याला नेटफ्लिक्स बघण्यासाठी पैसे मिळाले तर किती छान होईल. मात्र हा जॉब जोखमीचा आहे. हा जॉब करणारा व्यक्ती नेटफ्लिक्सचे सर्व शोज बघतो आणि ते बरोबर आहेत ना? हे तपासतो. यासाठी त्यांना भरपूर पैसे मिळतात.
झोपणे (Professional sleeper)
आता तुम्ही म्हणाल झोपणे हा काय जॉब आहे का? हो हा जॉब आहे. काही गादी बनवणाऱ्या कंपनी अशा काही लोकांना हा जॉब देतात जे त्या कंपनीच्या गाद्यांवर झोपतील. त्यांच्या झोपण्याच्या वेळेनुसार कंपनी ठरवते की गादी चांगली आहे की नाही.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.