जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / IPL 2023 : जिंकूनही आनंद साजरा करता येईना, मॅच संपताच KKR ला मोठा धक्का

IPL 2023 : जिंकूनही आनंद साजरा करता येईना, मॅच संपताच KKR ला मोठा धक्का

PBKS vs KKR

PBKS vs KKR

कोलकाता टीमला विजयाचा आनंद साजरा करायचा की टीमला मिळालेला धक्का पचवायचा असा प्रश्न पडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

PBKS vs KKR : पंजाब विरुद्ध कोलकाता खूप रोमांचक सामना नुकताच पार पडला. पंजाबच्या हातात असलेला खेळ कधी शेवटच्या चार ओव्हर्समध्ये बदलला हे समजलंच नाही. रिंकू सिंहने तर कमाल केली. मात्र कोलकाता टीमला जिंकलेल्याचा आनंद साजरा करता आला नाही. कोलकाता टीमला विजयाचा आनंद साजरा करायचा की टीमला मिळालेला धक्का पचवायचा असा प्रश्न पडला आहे. केकेआरकडून खेळणाऱ्या आंद्रे रसेल आणि रिंकू सिंगने धावांचा पाऊस पाडला. दोघांनी चार ओव्हर्समध्ये ५० हून अधिक धावा केल्या. अशा प्रकारे केकेआरला पाच गडी राखून विजय मिळवता आला. केकेआरला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य मिळाले. नाणेफेक जिंकून पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १७९ धावा केल्या. आयपीएलच्या शेवटच्या बॉलवर केकेआरला विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र रिंकू सिंगने चौकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा विजयाचा आनंद फारकाळ टिकला नाही. सामना संपल्यानंतर कोलकाता टीमच्या कर्णधाराला दंड भरावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाला वॉर्निंग देण्यात आली. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे हा दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा सीझनमधील पहिला गुन्हा असल्याने, नितीश राणाला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर पुढच्यावेळी ही चूक होणार नाही याबाबत वॉर्निंगही देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023 , KKR
  • First Published :
जाहिरात
जाहिरात