मुंबई, 29 मे: काही महिन्यांपूर्वी राज्यात आटोक्यात आलेल्या कोरोनानं (Corona) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट नवीन म्यूटेशन (New Mutations) असलेले BA.4 आणि BA.5 चे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या व्हेरिएंटचे (Variant) एकूण 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. यावरुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, क्लस्टर जिल्ह्यांना काळजी घेण्यासाठी सूचना करण्यात आली आहे.
काय म्हणाले राज्याचे आरोग्यमंत्री
काल मुंबईत अचानकपणे 500 नवीन रुग्ण आढळून आले. क्लस्टर भाग असणाऱ्या ठाणे, पुणे, पालघर या ठिकाणी देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार असून आज ज्या 30 ते 40 हजार चाचण्या आम्ही करत आहोत त्यात ही वाढ करावी लागणार आहे. क्लस्टर जिल्ह्यांना त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. काळजी करण्याचं, घाबरण्याचं सध्या काही कारण नाही, पण काळजी घ्यावी लागेल.
राजेश टोपेंचं आवाहन
संख्या वाढत आहे तिथे लोकांनी प्रसार होऊ नये यासाठी मास्क वापरत काळजी घेण्याची गरज आहे.
Omicron च्या BA.4, BA.5 Variant चा महाराष्ट्रात शिरकाव
ज्यात ओमिक्रॉनच्या बीए सबव्हेरिएंटने शिरकाव केला आहे. BA.4, BA.5 व्हेरिएंट घुसला आहे. पहिल्यांदाच राज्यात या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. सर्व सात रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोरोना रिपोर्टनुसार राज्यात पहिल्यांदाच ओमायक्रॉनच्या BA.4, BA.5 सबव्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. BA.4 चे 4 आणि BA.5 चे 3 रुग्ण आहेत. हे सातही रुग्ण पुण्यात आढळल्याची माहिती सरकारने दिली आहे. पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये या रुग्णांच्या नमुन्यांचं जीनोम सिक्वेसिंग झालं.
सात रुग्णांपैकी 4 रुग्ण पुरुष आणि 3 महिला आहे. 5 रुग्णांचं वय 50 पेक्षा जास्त आहे. 2 रुग्ण 20 ते 40 वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 10 वर्षांपेक्षा लहान वयाचा आहे. याआधी भारतात हैदराबाद या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण सापडला होता.
कुऱ्हाडीचे घाव घालत जन्मदात्या पित्याला केलं ठार, कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन
हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमायक्रॉनचा BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंट जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. 12 पेक्षा जास्त देशात हा सापडला आहे. सीएनबीसीच्या मते, कोरोनाच्या WHO मधील टेक्निकल प्रमुख मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कमीत कमी 16 देशांत BA.4 चे जवळपास 700 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. BA.5 चे 300 पेक्षा अधिक प्रकरणं 17 देशांत आहेत. कोरोनाचे हे सब व्हेरिएंच अधिक संसर्गजन्य आहेत पण तितके घातक ठरले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Rajesh tope