मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नवनीत राणांच्या तक्रारीची दखल, राज्यातल्या बड्या अधिकाऱ्यांना नोटीस, दिल्लीत फैसला होणार

नवनीत राणांच्या तक्रारीची दखल, राज्यातल्या बड्या अधिकाऱ्यांना नोटीस, दिल्लीत फैसला होणार

अमवरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने घेतली आहे.

अमवरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने घेतली आहे.

अमवरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने घेतली आहे.

मुंबई, 27 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने (Parlimetary Committee) घेतली आहे. खार पोलीस ठाण्यात आपल्याला चुकीची वागणूक दिली गेल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता दिल्लीत फैसला होणार आहे. संसदीय समितीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्तांसह आणखी एका बड्या अधिकाऱ्याला 15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. या सर्व बड्या अधिकाऱ्यांची आता दिल्लीत चौकशी होणार आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आल्यानंतर खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) पोलिसांकडून जी वागणूक दिली गेली होती त्याबद्दल त्यांनी संसदीय समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल अखेर संसदीय समितीकडून घेण्यात आली आहे. संसदीय समितीने चार अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि भायखळा कारागृहाचे अधिक्षक यशवंत भानुदास यांचा समावेश आहे.

('आधी भाजपने आमची ठोकली, आता आमचा मित्रपक्षच आमची ठोकतोय', शिवसेना खासदाराची खोचक टीका)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याला जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. विशेष म्हणेज राणा दाम्पत्याला जवळपास दोन आठवडे जेलमध्ये राहावं लागलं होतं. या दरम्यान खार पोलीस ठाण्यात पोलिसांकडून योग्य वागणूक न मिळाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. याप्रकरणी राणा यांनी संसदीय समतितीकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची समितीकडून दखल घेण्यात आली.

नवनीत राणा यांच्या आरोपांवर मुंबई पोलीस आयुक्तांचं ट्विट

नवनीत राणा यांनी पोलिसांवर आरोप केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ शेअर केला होता. या सीसीटीव्हीत राणा दाम्पत्य चहा आणि कॉफी घेताना दिसत होते. हा व्हिडीओ ट्विट करत संजय पांडे यांनी आणखी काही सांगायची गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता.

First published: