मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नवी क्रांती! भविष्यात कपड्यांच्या मदतीनं साधता येणार संवाद

नवी क्रांती! भविष्यात कपड्यांच्या मदतीनं साधता येणार संवाद

एक साधं अंगात घालायचं जॅकेट, कर्णबधिर व्यक्तीला पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करताना मार्गदर्शन करू शकलं तर? हे लवकरच खरं होणार आहे.

एक साधं अंगात घालायचं जॅकेट, कर्णबधिर व्यक्तीला पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करताना मार्गदर्शन करू शकलं तर? हे लवकरच खरं होणार आहे.

एक साधं अंगात घालायचं जॅकेट, कर्णबधिर व्यक्तीला पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करताना मार्गदर्शन करू शकलं तर? हे लवकरच खरं होणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 21 ऑक्टोबर :   समजा, एक साधं अंगात घालायचं जॅकेट, कर्णबधिर व्यक्तीला पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करताना मार्गदर्शन करू शकलं तर? किंवा मग त्या जॅकेटनी आपल्या व्हायटल साइन्सवर लक्ष ठेवलं आणि स्मार्टफोनसारखं काम केलं तर? ही कल्पना कदाचित अवास्तव वाटू शकते. पण, ती सत्यात उतरली आहे. रिसर्चरच्या एका टीमनं मानवी श्रवण प्रणालीवर (ह्युमन ऑडिटरी सिस्टिम) आधारित एक अ‍ॅकॉस्टिक फॅब्रिक विकसित केलं आहे. हे फॅब्रिक मायक्रोफोनसारखं कार्य करू शकतं.

    'क्लायमेट चेंज' ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे फॅशन इंडस्ट्री आता अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक फॅब्रिक म्हणजे कापड तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट एव्हाना सर्वांना माहिती आहे. पण, आता याच फॅब्रिकना आर्टिफिशिअल इंटिलिजन्सची क्षमताही जोडता येणार आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेतील इंजिनीअर्सनी रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाईनच्या (RISD) सहकार्याने, अ‍ॅकॉस्टिक फॅब्रिकची निर्मिती केली आहे. ज्याच्या सहाय्यानं हे फॅब्रिक परिधान करणार्‍यांशी संवाद साधता येऊ शकतो. आजकाल बहुतेक फॅब्रिक्स साउंड डॅम्पनर समजले जातात. ही बाब लक्षात घेता अ‍ॅकॉस्टिक फॅब्रिकची निर्मिती हे एक मोठं यश मानलं जात आहे. या शोधामुळे जगभरातील लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होऊ शकते.

    कसं काम करणार जॅकेट?

    शास्त्रज्ञांच्या टीमने विकसित केलेल्या फॅब्रिकमध्ये मायक्रोफोनप्रमाणे कार्य करण्याची क्षमता आहे. या फॅब्रिकचा वापर करून तयार केलेलं जॅकेट आवाजाचं अगोदर यांत्रिक कंपनांमध्ये आणि नंतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रुपांतर करतं. आपले कानही अशाच पद्धतीने काम करतात. एक साधं जॅकेट कार इंजिन सारखं दैनंदिन आवाज ओळखून ऐकू न येणाऱ्या व्यक्तीला संभाव्य धोक्याची सूचना देऊ शकतं, हे कदाचित अविश्वसनीय वाटेल. पण, हे शक्य झालं आहे. 'नेचर' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरमधील माहितीनुसार या स्मार्ट फॅब्रिकमध्ये इतरही अनेक वैशिष्ट्यं आहेत.

    ही गोष्ट साध्य करण्यासाठी, इंजिनीअर्सनी निरीक्षणांपासून सुरुवात केली. ऑडिबल साउंडला कंपनांच्या माध्यमातून फॅब्रिक्स प्रतिसाद देतात. पण, ही कंपनं सहसा ओळखता येत नाहीत, ही बाब निरीक्षणातून समोर आली. त्यामुळे आता या फॅब्रिकला फक्त ग्रहणक्षम बनवणं हा उद्देश होता. 'फ्लेक्सिबल फायबर'च्या विकासामुळे हे उद्दिष्ट साध्य झालं. जसं समुद्राच्या पाण्यावर सीवीडची हालचाल होते त्याप्रमाणे हे फॅब्रिक विणल्यानंतर वाकतं.

    तुम्ही फेकलेल्या कचऱ्यापासून तयार झाली आहे 'ही' सुंदर कार! डोळ्यांना बसणार नाही विश्वास

     या फायबरची रचना 'पीझोइलेक्ट्रिक'(piezoelectric) सामग्रीपासून केली गेली आहे. ही सामग्री वाकल्यानंतर किंवा यांत्रिकरित्या डीफॉर्म केल्यानंतर इलेक्ट्रिक सिग्नल तयार करते. परिणामी ध्वनी कंपनांना इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतरित करणं शक्य होतं, असं या रिसर्चच्या लेखकांनी सांगितलं आहे. अ‍ॅकॉस्टिक फॅब्रिकमध्ये फारच कमी तीव्रता असलेला आवाज कॅप्चर करण्याची क्षमता नाही. मात्र, हेच फॅब्रिक आवाजाची दिशादेखील निर्धारित करू शकतं. शिवाय, इतर फॅब्रिक्सद्वारे शोधले जाऊ शकणारे आवाजदेखील निर्माण करू शकतं.

    कपड्यांद्वारे संवाद

    हे फॅब्रिक भविष्यातील श्रवणयंत्र बनू शकतं. त्याचा वापर करून कर्णबधिर व्यक्तींना आवाज ओळखता येतील. याशिवाय, ज्या व्यक्तीने या फॅब्रिकपासून तयार केलेले कपडे परिधान केले आहेत तिच्या व्हायटल साईन्सवर लक्ष ठेवण्यास ते सक्षम असेल. शर्टच्या आतील भागात छातीवर हे फॅब्रिक वापरल्यानंतर संशोधकांना असं आढळलं की, ते हृदयाचे ठोके अचूकपणे ओळखू शकतं. म्हणजेच या कपड्यामुळे हृदयातील संभाव्य समस्या ओळखता येऊ शकेल.

    Video : वृक्ष संवर्धनाची नवी क्रांती, घरबसल्या मिळेल लावलेल्या झाडांची माहिती

     हे नवीन प्रकारचं फॅब्रिक एक वरदान मानलं पाहिजे. त्यापासून तयार केलेले कपडे वैद्यकीय बाबी जाणून घेण्यासाठी वापरले जाऊ शकतात. त्यांच्या मदतीनं एकमेकांशी संवाद साधता येईल. रिसर्चरर्सना त्यात आणखी काही शक्यता दिसत आहेत. " अ‍ॅकॉस्टिक कपडे घालून, तुम्ही फोन कॉल्सना उत्तर देऊन इतरांशी संवाद साधू शकता," असं या रिसर्चचे प्रमुख लेखक वेई यान म्हणाले. ते पुढे म्हणाले, "स्पेस डस्टमधील आवाज ऐकण्यासाठी स्पेसक्राफ्टच्या आवरणात हे फॅब्रिक लावता येऊ शकतं. इमारतींमधील तडे शोधण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय, समुद्रातील माशांवर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट नेट्समध्येही ते विणता येईल. भविष्यात व्यापक पद्धतीने त्याचा वापर होऊ शकतो."

    First published:

    Tags: Smart phone, Technology