News18 Lokmat

एअर स्ट्राईकवर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी सोडलं मौन; म्हणाल्या...

वायु दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण या पहिल्यांदाज बोलल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 04:39 PM IST

एअर स्ट्राईकवर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी सोडलं मौन; म्हणाल्या...

नवी दिल्ली, 5 मार्च : बालाकोट येथे भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आला. सरकारच्या या दाव्यावर विरोधकांसह अनेकांनी शंका घेत प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, आता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी मौन सोडलं असून किती दहशतवादी ठार झाले याची संख्या सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. सोमवारी, वायुदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्य भेद करणं हे वायुदलाचं काम आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या सरकार सांगेल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, एअर स्ट्राईकनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी देखील पत्रकार परिषद घेत वायु दलानं यशस्वीपणे लक्ष्यभेद केल्याचं म्हटलं होतं. पण, ठार झालेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी मात्र दिली नव्हती.


'या' नेत्यांकडून पुराव्याची मागणी

भारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले गेले. ज्यामध्ये पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले. तुम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करायचा होता? की झाडं उन्मळून टाकायची होती? असा सवाल केला आहे. हा एक चुनावी जुमला आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

Loading...

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं?' असा सवाल ट्विटवरून केला.

माजी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाचा हवाला देत एअर स्ट्राईकनं दहशतवाद्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही असं म्हटलं. तुम्ही दहशतवादाचं राजकारण करताय का? असं ट्विट करत सरकारला सवाल केला.

तर, तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भारतीय वायु दलाचं स्वागत केलं. पण, 200 ते 300 दहशतवादी ठार झाले याचा पुरावा काय? असा सवाल केला. दुसरीकडे, 'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?' असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला.तसेच दिग्विजय सिंह यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख हा दुर्घटना असा केल्यानं देखील आता नवा वाद निर्माण झाला आहे.

आज सर्वाधिक चर्चेत राहिलेले हे 5 VIDEO तुम्ही पाहिले का?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...