मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भारतात जर या वयोगटात कोरोना पसरला तर आहे सगळ्यात जास्त धोका!

भारतात जर या वयोगटात कोरोना पसरला तर आहे सगळ्यात जास्त धोका!

शनिवारी पहिल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने वयोगटाच्या अनुषंगाने कोरोना विषाणूच्या रुग्णांचा डेटा जाहीर केला.

शनिवारी पहिल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने वयोगटाच्या अनुषंगाने कोरोना विषाणूच्या रुग्णांचा डेटा जाहीर केला.

शनिवारी पहिल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने वयोगटाच्या अनुषंगाने कोरोना विषाणूच्या रुग्णांचा डेटा जाहीर केला.

    नवी दिल्ली, 05 एप्रिल : देशातील कोरोनाव्हायरसच्या(CoronaVirus) एकूण प्रकरणांपैकी 41.8% प्रकरणं केवळ 21-40 वयोगटातील आहेत. 41 ते 60 वर्षे वयाचा आकडा एकूण संख्येच्या 32 टक्के आहे. 60 वर्षांवरील लोकांमध्ये कोरोनाची प्रकरणे 16.69% आहेत. उर्वरित 8.61% रुग्ण 20 वर्षांचे आहेत. शनिवारी पहिल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने वयोगटाच्या अनुषंगाने कोरोना विषाणूच्या रुग्णांचा डेटा जाहीर केला. सरकारने पहिल्यांदाच वयासंबंधी दिला आकडा कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे देशातील संकट वाढत आहे. आतापर्यंत 3000 हून अधिक लोक संसर्गित झाले आहेत, तर 76 लोकांचा मृत्यू. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आणखी दोन कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी 75 लोकांनी प्राण गमावले असून 184 जण बरे झाले आहेत आणि उपचारानंतर त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. वय प्रोफाइलच्या आधारेही सरकारने हा डेटा सामायिक केला आहे. त्यानुसार 21-40 वयोगटातील कोरोनाचे 1,213 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 41-60 वर्षे वयोगटातील आणि 951 लोक 60 आणि त्याहून अधिक वयोगटातील 484 लोक कोरोना विषाणूमुळे बाधित आहेत. कोरोनाचे सगळ्यात जास्त वयोवृद्ध बाधित केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, 'सध्या देशात 58 गंभीर प्रकरणे आहेत, त्यापैकी बहुतेक केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्लीमधील आहेत. ते म्हणाले की कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्या 68 लोकांपैकी बहुतेक वृद्ध होते. मृत्यूच्या आकडेवारीनुसार, मृत्यू पावलेली बहुतेक लोक जास्त वयाची होती आणि आधीपासूनच उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडातील समस्या आणि ह्रदयाचा त्रास झटत होती.' भारतात तरुणांची संख्या जास्त भारतातील तरुणांची संख्या जास्त आहे, जर भारताची तुलना इतर देशांशी केली गेली तर 15-60 वर्षे वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 29.5% भारतीय 0-15 वयोगटातील आहेत. 62.5% 15-59 वयोगटातील आहेत आणि 8% 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत इटलीच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. बीबीसीच्या अहवालानुसार चीनमधील वृद्ध लोकसंख्याही 11% च्या वर होती. स्टेटिस्टा.कॉमच्या वेबसाइटनुसार, कोरोनो विषाणू 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 72% लोकांना संक्रमित करते. तर हे लक्षात घेण्यासारखे आहे की इटलीने 3 एप्रिलपर्यंत 6.2 लाख लोकांची चाचणी केली होती, तर भारताने आतापर्यंत केवळ 75,000 लोकांची चाचणी केली आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या